Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
मुख्य पान  >> 

विशेष लेख


Wednesday, May 16 AT 11:50 PM (IST)
गेल्या २० वर्षांपासून दुष्काळाला गावाच्या वेशीबाहेरच अडवून ठेवलेले हिवरे बाजार हे पाण्याचे ऑडिट मांडणारे देशातील पहिले गाव ठरले आहे. पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे या गावाची अर्थव्यवस्थाही बदलली.
Wednesday, May 16 AT 11:50 PM (IST)
जगभर दूरसंचार दिन साजरा होत असताना भारतातील या क्षेत्राची वाटचाल कोणत्या टप्प्यावर उभी आहे आणि त्यात ग्राहकाचे स्थान कसे आहे, याविषयी दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. प्र. ज. जोगळेकर यांच्याशी समीर कर्वे यांनी केलेली बातचीत.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
राज्यसभेची सेटलमेंट आणि शिवसेनेबरोबर नसल्याचा देखावा उभा करण्यासाठीच सेनेसह आघाडीने मनसेबरोबर 'साटेलोटे' केल्याची शक्यता नाकारता येत नाही. आज सेनेचे पदाधिकारी भाजपवर कितीही गरळ ओकत असले तरीही मनसेसोबत जाण्यासंदर्भातील बैठकांना सेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे भाजपने सेनेचा विश्वासघात केला, असे कसे म्हणता येईल?
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
गटबाज रिपाइं नेत्यांमुळे आंबेडकरी मतदार बसपला जवळ करू लागला आहे. तो सेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे या पक्षां-कडेही वळल्याचे ताज्या निवडणूक निकालावरून दिसते. रिपब्लिकन चळवळीची ही वाताहत रोखण्यासाठी चळवळीतील सर्वच नेत्यांनी, विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी गंभीरपणे विचार करून कृती करण्याची गरज आहे.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
प्राचीन काळापासून माणूस मांसाहार करत आला आहे. जसाजसा काळ बदलला तसतशी माणसाची जीवशैलीदेखील बदलली. या बदलत्या जीवनशैलीत माणूस मांसाहारापेक्षा शाकाहारावरच लक्ष केंद्रित करू लागला. मासांहार करणा-यांपैकी काहींनी शाकाहारी होऊन मांसाहार पूर्णत: वर्ज्य केला पण आज मांसाहार करणा-यांची फारच केविलवाणी अवस्था झाली आहे.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
भारताचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सन २०१२-१३ सालासाठी संसदेमध्ये बजेट सादर केले. ते करताना त्यांनी केलेल्या भाषणाचा संपादित भाग...
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या सुवर्ण कमळावर आपली मोहोर उमटवणा-या 'देऊळ', 'जयभीम कॉम्रेड' आणि 'विष्णूपंत दामले' या तीन मराठी चित्रकृतींच्या वेगळेपणाचा हा वेध-
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
गुढीपाडवा म्हणजे भारतीयांचा नववर्षारंभ दिन. त्यादिवशी साजरा होणारा 'चैत्रचाहूल' हा उपक्रम म्हणजे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवरचा देशी उताराच. गेली सहा वर्षे नव्यावर्षाची चाहूल देणारी संध्याकाळ साजरी करण्याचे आणि आपल्या संस्कृतीचे भान देण्याचे काम काही तरुण करत आहेत. येत्या २३ मार्च रोजी संध्याकाळी ही 'चैत्रचाहूल' यशवंत नाट्यमंदिरात साजरी होते आहे...
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
प्राचार्य ल. बा. रायमानेसरांवरील 'आधारस्तंभ' या गौरवग्रंथाचे काल औरंगाबादेत प्रकाशन झाले. लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेला आणि प्रा. अविनाश डोळस, राम दोतोंडे यांनी संपादित केलेला हा ग्रंथ दलितांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे. या ग्रंथातील डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या लेखाचा हा अंश...
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
नवहिंद बालमित्र मंडळ या कामगार विभागतल्या आघाडीच्या नाट्यसंस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आप्पा घाडी यांना नुकताच कै. वसंत सोमण पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने 'जल्लाद', 'सुवर्णकेदार', 'नागकन्या' अशा अनेक नाटकांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि या रंगभूमीवरच्या अनेक जादूगारांची याद आली...
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
'लव्ह, इन्शाअल्ला- द सिक्रेट लव्ह लाइव्हज् ऑॅफ अमेरिकन मुस्लिम विमेन्स्' या पुस्तकाने सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे कारण यात अमेरिकेन मुस्लिम महिलांची आत्मकथनं आहेत आणि त्यात त्यांनी प्रेम, लग्न, शरीरसंबंध, समलैंगिकता याविषयी आपली मते बिनधास्त मांडली आहेत...
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
शिशिर ऋतूत अगदी पानगळ झालेली पळस, पांगारा, शेवरीची झाडं वसंतात मात्र सर्वांगाने फुलून येतात. उन्हाचा कडाका वाढत असताना, हे पुष्पवृक्षंही वातावरणात लाल रंगाची उधळण करत असतात. जणू उन्हाच्याच ज्वाला भासणा-या या फुलांविषयी...
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
मुळा आणि मुठा दोघी संगमावर भेटल्या. वेगवेगळ्या रसायनांच्या वासाने दोघी गुदमरून गेल्या होत्या. मुळा वैतागून मुठेला म्हणाली-
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी आणि ध्येयवादाशी पक्की नाळ जुळलेली पल्लवी गेलं दशकभर भटक्याविमुक्तांच्या चळवळीसाठी पूर्णवेळ आणि विना मानधन झटत आहे. तिच्या डोळ्यापुढे व्यवस्था परिवर्तनाचं आणि जात, वर्ग, लिंगभेद निर्मुलनाचं स्वच्छ संकल्पचित्र आहे... सामाजिक कार्यकर्ती असलेल्या पल्लवी रेणकेबद्दल सांगत आहेत तिचे वडील, भटक्या-विमुक्तांचे नेते बाळकृष्ण रेणके.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
'मराठी सिनेमा इज द मोस्ट हॅपनिंग सिनेमा इन इंडिया टुडे', असं सध्या म्हटलं जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीबद्दल भारतीय चित्रपट वर्तुळात फार कौतुकाचं आणि कुतूहलाचं वातावरण आहे, त्याचाच हा पुरावा. गेली काही वर्षं सतत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचा उल्लेख होतो आहे.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
सुमारे १४ वर्षांपूर्वी, महाराष्ट्रात सेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना ११ जुलै १९९७ रोजी मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कुणा जातीयवाद्याने चपलांचा हार घातला. ही गोष्ट समजताच कॉलनीच्या परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनेचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
चिमणी... लहानपणी ज्या पक्षाशी पहिली ओळख होते ती चिऊताई. पण या चिऊताईची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जागतिक चिमणी दिनानिमित 'मटा'च्या वाचकांसाठी या पक्ष्याचा घेतलेला हा वेध...
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
अर्थसंकल्प न वाचता टाकाऊ ठरवणे अथवा अकारण डोक्यावर घेणे, हे दोन्ही पवित्रे घेण्याचे कारण नाही. मात्र या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे अनुदानांविषयी स्वीकारलेले नवे धोरण.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
उसासारखे अमाप पाणी फस्त करणारे पीक, कृषी उद्योग, मद्यार्क व रासायनिक उद्योग आणि शहरांना घरगुती व व्यापारी वापर यांसाठी अफाट पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे महाराष्ट्रात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
यावर्षी ९५ लाख गाठी निर्यात करूनही १२-१३ लाख गाठी अजून निर्यात करण्याची क्षमता असताना कापसाच्या निर्यातीवर तडकाफडकी बंदी घालण्याची काही गरज नव्हती.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
यावर्षीचे बजेट पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर व लोकसभेच्या आगामी निवडणुकीस दोन वर्षे शिल्लक असताना सादर होत असल्याने सवंग लोकप्रियतेचा विचार न करता अर्थमंत्री अप्रिय, पण आवश्यक निर्णय घेतील, अशी अनेकांची अपेक्षा (किंवा इच्छा) होती.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
रस्ता, पाणी, वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या गावात राहून, या सुविधांसाठी यशस्वी लढा देणा-या शिवाजी पोटेची ही कहाणी. पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील त्याच्या गावाला राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
लेखकाचं चरित्र तपासून त्याच्या साहित्यकृतीचा अर्थ लावणारी एक समीक्षा पद्धती आहे. आता वाचकही साहित्यकृतीत लेखकाचं खाजगी जगणं शोधू लागले आहेत. हा प्रकार घातक आहे, हे सांगणारा मार्मिक लेख...
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
वर्तमानावर एवढे सहज आणि सुंदर भाष्य कोण करू शकेल? हे तर केवळ तुकारामबुवांनाच शक्य आहे. पुढील दोन पायात तोंड खूपसून मध्यरात्रीची डुलकी घेत असलेल्या लठ्ठ्या बोक्याने अभंग ऐकून आधी कान टवकारले आणि मग तोंड बाहेर काढले. तिथून थोड्याच अंतरावर शेपटी चावत बसलेल्या घारी मांजरीनेही अभंग ऐकले होतेच.
Wednesday, May 16 AT 01:48 AM (IST)
यशवंतराव चव्हाण अर्थात 'साहेब' म्हणजे शब्दांचे जादुगार! मला त्यांच्याशी जवळकीच्या नात्यातून अगदी 'ऑफबीट' गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्या प्रश्नोत्तरांचं एक पुस्तक करायचं होतं- 'प्रश्नबत्तिशी' नावाचं. पण ते राहूनच गेलं... सांगताहेत वनाधिपती विनायकदादा पाटील