Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
मुख्य पान  >> 

NRI मराठी


Monday, February 13 AT 09:25 PM (IST)
Stratfor या नियतकालिकात George Friedman यांनी लिहिलेल्या इंग्रजी लेखाचे हे रूपांतर आहे. जास्त तपशील लेखाच्या शेवटी दिलेला आहे. ज र होर्मूझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीस बंद केली तर ते 'लक्ष्मणरेषा' ओलांडल्याचे कृत्य मानले जाईल, अशी तंबी देणारे पत्र अनेक मध्यस्थांकरवी[१] अमेरिकेने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात इराणला पाठविल्याचे वृत्त आहे.
Monday, February 13 AT 08:55 PM (IST)
ती न तासांच्या नयनरम्य समुद्राप्रवासानंतर प्रवासानंतर एकदाची आमची बोट कोमोडो आयलंडच्या अतिसुंदर समुद्र किनाऱ्यावर धडकली. कमोडो आयलंडवरील कोमोडो ड्रॅगन जवळून पाहणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. ज्या वेळी कोमोडो आयलंडचा समावेश युनेस्कोने जगातील पहिल्या सात नैसर्गिक आश्चर्यांमध्ये केला, तेव्हापासून या जागेबद्दलची माझी उत्सुकता शिगेला पोचली होती.
Friday, February 03 AT 08:08 AM (IST)
Releasing on Feb. 17th:   Ravi Malhotra, an NRI living in the US, works for the mighty Larson & Jason, a US based multinational, which builds huge civil projects throughout the world like dams & bridges. One of its recent contracts in India, the Dharbhanga Dam project in Bihar at District Saurabhpur was planned & executed with a hundred year warranty, by their top architect & engineer Ravi Malhotra.
Thursday, February 02 AT 12:56 PM (IST)
च मचमणार्‍या हिर्‍यांचा उच्चभ्रू वर्तुळात एक खास दिमाख असतो. मौल्यवान हिरे हस्तगत करण्यासाठी चौर्यकर्मापासून ते क्रौर्याच्या घटनाही ऐकिवात आहेत. पण डॉ. अनिरुद्ध सुमंत यांच्या मते अशा या हिर्‍याची अजून एक खासियत आहे त्याच्यामधील भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामधे! हिर्‍यातील अंतर्गत गुणधर्मांचा अभ्यास करून आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे विविध क्षेत्रामधे त्यांचा वापर करण्याबाबत डॉ. अनिरुद्ध सुमंत यांचे सध्या  संशोधनकार्य चालू आहे.
Wednesday, February 01 AT 12:17 PM (IST)
"भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे' असे आपण नेहमी ऐकतो. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? रशियात तर काही "धार्मिक' लोक भगवतगीतेवर बंदी घालायला निघाले होते. अमेरिकेत काय परिस्थिती आहे? गेली पंधरा वर्षे मी अमेरिकेत राहतो आहे. बहुतांश लोक इतरांच्या धार्मिक बाबतीत नाक खुपसत नाहीत.' धार्मिक, श्रद्धेच्या बाबतीत आपण काही बोलून दुसऱ्यांचा अपमान तर करत नाही ना?' हे कटाक्षाने पाहिले जाते.
Friday, January 27 AT 03:28 PM (IST)
दुबई - उत्साहात आणि जवळपास चार हजार नागरिकांच्या उपस्थितीत, येथील इंडियन हायस्कूलच्या प्रांगणात भारताचा ६३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. थंडी असूनही नागरिकांची मोठ्या प्रमाणात असलेली उपस्थिती, हीच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाची साक्ष पटवत होती. शाळेचे अध्यक्ष मोहन वालर यांनी सर्व उपस्थितांचे आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कौन्सुल जनरल संजय वर्मा यांचे स्वागत केले.
Wednesday, January 25 AT 07:10 PM (IST)
कोडोली - "ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शंकरनाना मिरगुंडे हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्यांचे योगदाने मोठे आहे,' असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केले. येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शंकर अनंत मिरगुंडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित "पालवी वटवृक्षाची, अष्टपैलू स्वातंत्र्यसैनिकांची' या जीवनगौरव ग्रंथाचे प्रकाशन श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
Wednesday, January 25 AT 06:55 PM (IST)
इचलकरंजी - भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितीच्या 20 जागा लढविणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष (ग्रामीण) आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. यापैकी पहिली यादी जाहीर केली. निवडणूक भाजप-शिवसेना-आरपीआय, महायुतीद्वारे लढणार असून, काही ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थानिक पातळीवर मदत करणार असरल्याचेही आमदार हाळवणकर यांनी जाहीर केले आहे. उमेदवार निवडीसाठी पक्षाच्या जिल्हा निवड समितीची बैठक नुकतीच झाली.
Tuesday, January 24 AT 09:25 AM (IST)
आ जकाल पाकिस्तानचे सार्वभौमत्व चांगलेच गाजत आहे, पण चुकीच्या कारणांसाठी! जवळ-जवळ रोजच केल्या जाणार्‍या ’ड्रोन’ हल्ल्यांतून[१] या सार्वभौमत्वाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. पण गंमत अशी कीं अगदी अलीकडेपर्यंत असा समज होता (आणि अद्यापही आहे) कीं हे हल्ले पाकिस्तानच्या मान्यतेनेच नव्हे तर त्याच्या मदतीनेच होत आहेत.
Saturday, January 07 AT 12:01 PM (IST)
हा लेख पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाचे (पाकिस्तानच्या) पंजाब मतदारसंघातून निवडून आलेले खासदार अयाज अमीर यांनी लिहिलेला आहे व मी तो त्यांच्या अनुमतीने अनुवादित करून इथे प्रकाशनार्थ देत आहे. त्यांचाच "पाकिस्तानचा इतका उदो-उदो नको करायला" हा मी अनुवादित केलेला लेख ’ई-सकाळ’वर नुकताच प्रकाशित झाला होता. हा लेखही अयाजसाहेबांनी तितकाच सडेतोडपणाने लिहिलेला आहे व तोसुद्धा ई-सकाळच्या वाचकांना आवडेल अशी आशा आहे.
Monday, December 26 AT 09:05 AM (IST)
म राठी संस्कृतीला या अनोळखी प्रदेशात विशेषतः परदेशात जपण्यासाठी येथे अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. या उद्देशानेच मागल्या वर्षी हौन्स्लो येथे मराठी मंडळ स्थापन करण्यात आले. 'धमाका 2011'चे यश लक्षात घेता, 1 जानेवारी 2012 रोजी नूतन वर्ष साजरे करण्याचा हौन्स्लो मित्र मंडळाने घाट घातला आहे. 'धमाका 2012' कार्यक्रमाचे आयोजन या कार्यक्रमासाठी हौन्स्लो मित्र मंडळाला 'महाराष्ट्र मंडळ लंडन' यांचे सहकार्य लाभले आहे.
Monday, December 19 AT 12:32 PM (IST)
"प्र त्येक हरवलेल्या माणूसाला मी माझा मुलगाच मानतो" असे अब्दुल कादिर बलूच नेहमी म्हणतात! त्यांचा मुलगा जलील रेकी बेपत्ता झाला होता व तब्बल अडीच वर्षानंतर अलीकडेच तो मृतावस्थेत सापडला. अब्दुल कादिर बलूच ६० वर्षाचे असून सेवानिवृत्त बँक कर्मचारी आहेत.
Monday, November 28 AT 10:02 AM (IST)
यं दा ऑक्टोबरमधील दीपावली  आणि नोव्हेंबर महिन्याचा (चौथा गुरुवार) अमेरिकी थँक्स गिव्हिंग सणादरम्यान अमेरिकेतील इलिनॉय राज्यात हिंदू स्वयंसेवक संघाच्या (http://www.hssus.org/) पाच शाखांनी (अरोरा, शाम्बर्ग, लेक काउंटी, ब्लूमिंगटन आणि पिओरिया) एकत्रितपणे अन्नदान (फूड ड्राइव्ह) आणि त्यानिमित्त रोख रक्कम व काही दैनंदिन आवश्यक वस्तूंच्या दानाची मोहिम आयोजित केली होती.
Tuesday, November 22 AT 07:40 PM (IST)
नु कतंच फेसबुकवरील पोस्टमुळं समजलं, की संजीवन विद्यालयाच्या आमच्या सरलताई टीचर गेल्या. मी लगेच पाचगणीला फोन लावला आणि शशिताई टीचरशी बोललो. या बोलण्यावरूनच मला समजलं, की सरलताई आणि शरदनानांची मुलगी अदिती, सध्या सान फ्रान्सिस्कोजवळच्या डब्लीन येथे आपल्या नुकत्याच जन्मलेल्या नातवाला भेटण्यासाठी इथे आली आहे. मी तिला लगेच फोन लावला. ती म्हणाली, "नाना पूर्वीच गेले आणि आता आई पण गेली. आम्ही आता अनाथ झालो." माझ्या काळजात चर्र झालं.
Saturday, November 19 AT 12:53 PM (IST)
पुरंदरे प्रकाशन नेहमीप्रमाणे दणदणीत व नाविन्यपूर्ण सवलत योजना घेऊन आपल्यासमोर येत आहे. सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती मीना प्रभू ह्यांच्या ४ पुस्तकांवर ७ पुस्तके मोफत मिळणार आहेत. सोबत ५,००० छायाचित्रांच्या संग्रहाची १ डीवीडी मोफत.   ह्या योजनेचे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे. पुरंदरे प्रकाशनाने वाचकांच्या सोयीसाठी नेट बुकिंग हे आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे ठरवले आहे बुकगंगा.
Friday, November 18 AT 10:05 AM (IST)
५ नोव्हेंबर २०११ रोजी फिनिक्सच्या मराठी मंडळाच्या दिवाळी कार्यक्रमात मुंशी प्रेमचंद ह्यांच्या ईदगाह गोष्टी वर आधारीत एक आगळी वेगळी संगीत नृत्यनाटिका 'जत्रा' सादर करण्यात आली. मराठी रंगभूमी दिवसा निमित्त जत्रा कलाकारांची ही मराठी रंगभूमीला एक मानवंदना होती. तसच जत्रा ही नाटिका वरकरणी जरी गरीब आजी व जत्रेत जाणाऱ्या लहान अनाथ मधूची असली तरी खऱ्या अर्थाने ती जगाच्या जत्रेत आलेल्या आपल्या सर्वांच्या संघर्षाची कथा आहे.
Wednesday, November 16 AT 06:35 AM (IST)
This took place in Charlotte, North Carolina.   A lawyer purchased a box of very rare and expensive cigars then insured them against, among other things... "FIRE"..!!   Within a month… having smoked his entire stockpile of these great cigars... the lawyer filed a claim against the insurance company.   In his claim, the lawyer stated the cigars were... "lost in a series of small fires'.
Saturday, November 12 AT 10:27 AM (IST)
व्हि एतनामच्या सागरी हद्दीत असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात "सागरी तेल समन्वेषण" प्रकल्पात सहभागी होण्यासाठी त्यांच्या बरोबर भारताने नुकताच करार केला. भारताचे परराष्ट्रमंत्री कृष्णा यांच्या नुकत्याच झालेल्या हनोई भेटीत या करारावर सह्या करण्यात आल्या. या वाणिज्य कराराबरोबरच कांहीं संरक्षणविषयक करारही करण्यात आले. चीनला हे अर्थातच पसंत पडले नाहीं व त्यामुळे त्याने कृष्णांच्या भेटी आधीपासूनच गुरगुर करायला सुरुवातही केली.
Tuesday, November 08 AT 10:10 PM (IST)
फ्रा न्सची राजधानी पॅरिसमध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना होऊन सात वर्षे पूर्ण झाली. स्थापनेच्या पहिल्या वर्षापासून शहरातील सर्व मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. ही प्रथा आजही अव्याहतपणे चालू आहे. दिवाळीच्या आनंदात सहभागी करून देण्यासाठी, तसेच मराठी संस्कृतीशी त्यांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने, प्रतिष्ठित फ्रेंच नागरिकांनाही या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेण्यात येते.
Friday, October 21 AT 04:34 PM (IST)
पुणे - प्रशांत दामले फॅन्स फाउंडेशन निर्मित श्री तशी सौ या नाटकाने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये धमाल उडविल्यानंतर, आता ब्रिटनमध्येही हास्यकल्लोळ उडविण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रशांत दामले आणि वंदना गुप्ते हे दोन दिग्गज अभिनेते या नाटकाच्या निमित्ताने बऱ्याच काळाने एकत्र आले आहेत. या नाटकाचे मूळ लेखक सुधीर कवडी असून, विनोद हडप यांनी त्यात बदल करून ते व्यावसायिक रंगभूमीवर आणले आहे. प्रशांत दामले आणि वंदना गुप्ते या जोडीचे शू...
Friday, October 21 AT 11:40 PM (IST)
कामरान शफ़ी यांनी लिहिलेला हा लेख २९ सप्टेंबर २०११ रोजी "एक्सप्रेस ट्रिब्यून"मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झाला. या लेखात आलेले प्रथमपुरूषी उल्लेख लेखकाबद्दलचे आहेत. पाकिस्तानातील एका बाजारात ’अमेरिका मुर्दाबाद’च्या घोषणा देणार्‍या पाकिस्तानी नागरिकांचा "वॉल स्ट्रीट जर्नल"मध्ये गेल्या बुधवारी प्रसिद्ध झालेला फोटो खूप लोकांनी पाहिला असेल. पाहिला नसेल तर तो http://si.wsj.net/public/resources/images/P1-BC689_MULLEN_G_20110927184752.jpg इथेही पहाता येईल.
Thursday, October 20 AT 06:05 AM (IST)
म्युनिकमध्ये येऊन मला एक वर्ष झाले. आल्यापासून उत्कंठेने वाट पाहात होतो ऑक्टोबर महिन्याची. कारण याच महिन्यात आयोजित करण्यात येतो जगविख्यात 'ऑक्टोबर फेस्ट' अर्थात बिअर फेस्टिव्हल. केवळ जर्मनीतूनच नाही, तर जगातून बिअर चाहत्यांची म्युनिकच्या दिशेने वाटचाल चालू असते. जगातील हा सर्वात मोठा सोहळा समजला जातो. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटचा व ऑक्टोबरचा पहिला, असे दोन आठवडे चालणाऱ्या या सोहळ्यात जगभरातून ६५ लाख लोक आवर्जून हजेरी लावतात.
Wednesday, October 12 AT 09:17 AM (IST)
किंशासामध्ये या वर्षी गणेश उत्सव साजरा होणार कि नाही, या संभ्रमामध्ये असलेली लोकांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला. कारण संभाजी देशमुख कुटुंब दिनांक १२ ऑगस्टला सुट्टीवरून परत आले आणि बरोबर श्रींची मूर्ती न विसरता आणि अतिशय काळजीपूर्वक व सदभावनेने आणली. हि बातमी ऐकल्यावर गणेश प्रेमी खूपच खुश झाले. सिंधी आणि  तमिळ समूह भलताच आनंदित झाला होता.
Wednesday, October 12 AT 11:15 AM (IST)
आम्ही विशी -पंचविशीत अमेरिकेत आलो तेव्हा वाटलं नव्हतं की सबंध आयुष्यच इथे जाईल म्हणून! 'निघू, निघू म्हणता म्हणता , पाय काही निघत नाही' असं होऊन गेलं खरं आणि आता विचार करावा लागतोय की यापुढे काय नि कसं निभायचं? अमेरिकेतील सुबत्ता आम्ही अनुभवली, आता मंदी नव्यानेच जाणवतेय. आमच्या इतकी सुस्थिती आमच्या पुढील पिढीला मिळेल असं मात्र आता वाटत नाही.
Tuesday, October 11 AT 11:48 AM (IST)
रामदास गोठिवरेकर या अभिजात संगीत कलावंताचे नुकतेच मॅंचेस्टर येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना वाहिलेली आदरांजली. इंग्लंडहून वासू जोशीकडून मला बातमी समजली. काही क्षण माझ्या संवेदनाच गोठल्या व गेल्या कित्येक वर्षांच्या सहवासाच्या आठवणींनी मनात काहूर माजले. शशी ऊर्फ रामदास गोठिवरेकर यांची माझी 1968 मध्ये, मी मॅंचेस्टरजवळ मेडिकल प्रॅक्‍टिस करत असताना ओळख झाली व ओळखीचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले.