Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

हास्याचा धबधबा - गुलाब बोरगावकर

Mahanews
Thursday, June 16, 2011 AT 09:49 AM (IST)
दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाब बोरगावकर या जोडीने ढोलकी फडाच्या तमाशात सोंगाडयाची जोडगोळी म्हणून कारकीर्द गाजविली. गुलाब बोरगावकर यांचे मूळ नाव गुलाब मोहमंद जामदार. सांगली जिल्ह्यातील बोरगावच्या गुलाबने सातव्या इयत्तेत शाळेला रामराम ठोकला. काही काळ तालीम काही काळ उनाडक्या करणाऱ्या गुलाबकडे समय सूचकता मोठी होती. नाटक, भजन आणि तमाशा या तीनही प्रकाराकडे गुलाबचा ओढा होता. आमदभाई इस्लामपूरकर यांच्या तमाशात गुलाब सामील झाला. आमदभाई इस्लामपूरकर आणि माधव नगरकर यांचा तमाशा एकमेकांच्या समोर आला तेंव्हा नगरकरांच्या तमाशातील गणपत चव्हाण, साविंदणेकर, सीता येवलेकर आणि गोंधळी समाजाचे पेटीमास्तर बाबूराव बोरगावकर यांची कला पाहून गुलाब बोरगावकर प्रभावित झाले.

गुलाबराव बोरगावकरांनी माधव नगरकर आणि नंतर चंद्रकांत ढवळपूरीकर यांच्या तमाशात सोंगाडया म्हणून काम केले. गुलाबराव बोरगावकर आणि मास्टर दत्ता महाडीक यांची जोडी पुढे तमाशा सृष्टीत लोकप्रिय ठरली. या दोघांनी मिळून स्वतंत्र तमाशा काढला. गुलाबराव बोरगावकर आणि मास्टर दत्ता महाडीक यांनी सादर कलेले विनोद आणि त्यांनी गाजविलेले वग आणि त्यातील भूमिका पुढील प्रमाणे-

दत्ता महाडीक :- का रे मित्रा, तुझा चेहरा का असा उतरल्यासारखा झाला?
गुलाबराव बोरगावकर :- बायकोचं अन् माझं भांडण झालय
दत्ता महाडीक :- कशावरून?
गुलाबराव बोरगावकर :- बायको म्हणत हुती, पोराला इंजिनियर करायचय, अन् मी म्हणत होतो पोराला वकील करायचंय…
दत्ता महाडीक :- दोघांचंही बरोबर आहे.
गुलाबराव बोरगावकर :- पण या गोष्टीवरून आमच्या दोघांचं भांडण सुरू झालं. कुणीच माघार घेईना. भांडण गेलं कोर्टात. कोर्ट म्हणालं, तुमच्या दोघांचं म्हणणं बरोबर हाय, पण पोराचं काय म्हणणं हाय ते त्या पोराला विचारायला पाहिजे तेव्हा पोराला कोर्टात हजर करा.
दत्ता महाडीक :- मग केला का पोराला कोर्टात हजर?
गुलाबराव बोरगावकर :- कसं करणार?
दत्ता महाडीक :- का?
गुलाबराव बोरगावकर :- आम्हाला अजून पोरगाच झाला नाही ना!
दत्ता महाडीक:- आयला! कोर्टानं तुम्हाला फाशीची शिक्षा कां नाही केली? पोरं व्हायच्या आधीच भांडतोयास?
गुलाबराव बोरगावकर:- बायको वेडी. तिला कळायला नको का?
दत्ता महाडीक:- तू मोठा शहाणा लागून गेलास लेका!
गुलाबराव बोरगावकर:- मग शहाणा आहे म्हणून तर तमाशात आलो.

अशा पध्दतीने गुलाबराव बोरगावकर आणि दत्ता महाडीक तमाशात बतावणी सादर करीत. या दोघांनी मुंबईचा हमाल, गवळयाची रंभा, लडडू सिंग, सात पिढयाचं वैर, नायकिणीचा रंग महाल, इंदिरामठाचे गुपीत, शत्रुशी झुंजला बांगला, ज्ञानेष्वर माझी माऊली, संत तुकाराम, असे पुढारी ठार करा, लग्नाआधी कुंकू पुसले, मानवत खून खटला इ.वगनाटयात गुलाबराव बोरगावकर व दत्ता महाडीक यांनी काम केले.

- प्रा.डॉ.प्रकाश खांडगे
हास्याचा धबधबा - गुलाब बोरगावकर

प्रतिक्रिया
 
On 22/03/2017 03:53 PM D B G said:
दोघे हि उत्तम कलाकार होते

 
On 04/11/2015 05:10 PM sunil pharne said:
गुलाब इज गुलाब तो नेहमी सर्वाना सुगंधच देतो व असा विनोद सम्राट कधीच जन्माला येणार नाही

 
On 28/07/2015 11:51 PM sopan nanabhau bhange said:
संगीतरत्न marhatmola कार्यक्रम आहे

 
On 28/07/2015 11:50 PM sopan nanabhau bhange said:
संगीतरत्न marhatmola कार्यक्रम आहे

 
On 17/02/2015 10:26 PM Shrirang Jadhav said:
Very very nice

 
On 27/06/2014 07:06 AM walunj raosaheb said:
Jodi no1

 
On 20/08/2013 08:06 PM Pravinkumar gaikwad said:
तमाशाच्या दुनियेत बरेच कलाकरांनी नाव गाजवलेले आहे.संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी समाजप्रबोधन गित रचलि आणि गायली,तसेच तुकाराम खेडकर यांचे चिरंजिव तमाशा सम्राट रघुविर खेडकर यांची अजुन पर्यत महाराष्ट्रवर वर्चस्व आहे, त्या खालोखाल मंगला बनसोडे व नितिन बनसोडे, अमन तांबे व किरनकुमार ढवळपुरिकर,साहेबराव नांदवळकर,अक्काताई कराडकर,मालती ईनामदार, काळु बाळु,भिका भिमा, गुलाबराव बोरगावकर

 
On 22/05/2013 02:35 PM SURESH MAHADIK said:
चांगला कलाकार होता असा कलाकार मिळणे कठीण आहे . मला दत्ता महाडिक याची सी डी पाहिजे माजा मोबईल नंबर ९९८७३३४८०० आहे

 
On 06/04/2013 03:56 PM kamalakar said:
वेल दाने

 
On 13/10/2011 02:11 PM mohite-patil arun said:
jabardasth