|
Monday, February 06 AT 07:55 PM (IST)
|
कोल्हापूर - दरोड्याच्या तयारीत असताना अटक केलेल्या स्वप्नील तहसीलदारसह (एस. टी.) दहा जणांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. दरम्यान, सायंकाळी जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनीही त्यांच्याकडे कसून चौकशी करत "खाक्या' दाखविला. कदमवाडी परिसरातील ओंकार बंगल्यात तहसीलदारसह सर्वांवर कारवाई केली.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:54 PM (IST)
|
कोल्हापूर - एकधारीचा लिंबू करामत करणार आहे. मतदारांना वश करणार आहे. फक्त मतदारसंघाच्या सीमेवरून लिंबू फिरवा. तिठ्ठ्याला एक-एक टाका. म्हणजे काम फत्ते होईल, असा विजयाचा मंत्र एका मांत्रिकाने एका अंधश्रद्धाळून उमेदवाराला दिला. उमेदवाराच्या कट्टर समर्थकांनी रात्रीत ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. राधानगरी तालुक्यातील पणोरी रोडवरील रात्री बाराच्या सुमारास घडलेला हा प्रकार. दोघे विजार शर्टवर आणि एक तरणबांड पोरगं मोटारसायकल चालवायला.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:53 PM (IST)
|
कोल्हापूर - सेवानिवृतीनंतर अनेकजण उर्वरित आयुष्य सुखात जगण्याचा प्रयत्न करतात. निवृत्तीनंतर सेवेच्या ठिकाणी कोण पुन्हा कार्यरत राहीलच असे नाही. मिळालेली पुंजी एखादा छोटा व्यवसाय, गुंतवणूक किंवा अन्य कारणांसाठी मार्गी लावून कुटुंबात रमण्याचा प्रयत्न करतात पण निवृत्तीनंतर अखेरच्या श्वासापर्यंत संस्थेची सेवा करण्यातच आनंद आणि धन्यता मानणारा एक "सेवायात्री' नुकताच निघून गेला. अशा या सेवायात्रीची सेवा समाजाला आदर्शवत आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:52 PM (IST)
|
कसबा बीड - आमशी (ता. करवीर) येथे गोबरगॅसची टाकी दुरुस्त करताना पाय घसरून पडल्याने एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला. जोतिराम बाबूराव पाटील असे मृत झालेल्याचे नाव आहे. आनंदा बचाटे जखमी आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील बाबूराव सदाशिव पाटील यांचा गोबर गॅस नादुरुस्त झाला होता. श्री. बचाटे व जोतीराम पाटील दुरुस्तीचे काम करत होते. जोतीराम पाटील यांचा कुंडीवरून पाय घसरल्याने ते टाकीत पडले.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:50 PM (IST)
|
इस्लामपूर - राज्यातील सहकारी चळवळीचा कणा असलेल्या राज्य सहकारी बॅंकेवर प्रशासक आणण्याचे कट-कारस्थान कॉंग्रेसने केले. बॅंकेची परिस्थिती सुधारत असताना सहकारी चळवळीला ताकद देणारी महत्त्वाची शिखर संस्था प्रशासक आणून अडचणीत आणली, असे प्रत्युत्तर ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल केलेल्या आरोपांना आज दिले. ते "सकाळ'शी बोलत होते.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:49 PM (IST)
|
सांगली - राज्यातील सत्तेत भागीदार असणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रसने परस्परांना दिलेला शह-प्रतिशह, आव्हान-प्रतिआव्हान यामुळे अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या ठरलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज  (ता. 7) मतदान होत आहे. मिनी विधानसभा असेच स्वरूप या निवडणुकीला आले आहे. दोन्ही कॉंग्रसने सर्वाधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे, त्यामुळे निकाल काय लागणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:48 PM (IST)
|
कोल्हापूर - जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी आज(ता. 7) मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील घरा-घरांत "चला मतदानाला जाऊ या' अशी साद एकमेकांना घातली जाणार आहे. दोन मंत्री, दोन विद्यमान आणि एक माजी खासदार, सात आजी आणि नऊ माजी आमदारांबरोबरच जिल्हा बॅंक, "गोकुळ,' तसेच साखर कारखान्यांच्या आजी-माजी संचालकांचे राजकीय भवितव्य ही निवडणूक ठरवणार आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:45 PM (IST)
|
कोल्हापूर - डंपरने चिरडल्याने सुदीप शांताराम मंजुळकर (वय 2, रा. केर्ले, ता. करवीर, मूळ रा. विजापूर) हा बालक जागीच ठार झाला. आज दुपारी दोन वाजता केर्ले येथे ही दुर्घटना घडली. पोलिसांनी सांगितले, की केर्लेजवळ क्रशरचे काम सुरू आहे. त्या ठिकाणचा डंपर दुपारी केर्ले जवळील कच्च्या रस्त्यावरून जात होता. त्यावेळी सुदीप खेळत रस्त्यावर आला. याचवेळी डंपरचालकास गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही व मागच्या चाकात सापडून सुदीप ठार झाला.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:44 PM (IST)
|
जयसिंगपूर - शेतात गवत कापणाऱ्या महिलेचा गळा आवळून निर्घृण खून झाल्याची घटना आज उदगाव (ता. शिरोळ) येथे घडली. उज्ज्वला पटू भंडारे (वय 30) असे मृत महिलेचे नाव असून खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर संशयितांविरोधात गावात संतापाची लाट उसळली. आज दुपारच्या सुमारास उदगाव-चिंचवाड मार्गावरील जुन्या घालवाड रस्त्यावर शेतात ही घटना घडली. भंडारे यांचे जुन्या घालवाड रस्त्यावर शेत आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
|
सातारा - कामगार विरोधी धोरण कामगारांच्या जीवनासाठी आणि देशासाठी घातक आहे. संघटित, असंघटित कामगारांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यावर तातडीने निर्णय घेतले नाहीत, तर शासनाला धडा शिकवूया, असा निर्धार करत आज तालीम संघाच्या मैदानावर भारतीय मजदूर संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाची सांगता उत्साहात झाली. सांगता समारंभापूर्वी शहराच्या विविध भागांतून काढलेल्या रॅलीत भारतीय मजदूर संघाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:08 PM (IST)
|
नगर - लग्नसराईचा हंगाम, ऊन वाढण्यास सुरवात झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेतून साखरेला मागणी वाढली आहे. गेल्या दोन महिन्यांत प्रथमच साखरेला मागणी वाढल्याने भावात सुमारे पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारीसाठी केंद्र सरकारने 16 लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. या महिन्यात लग्नसराई आहे. तसेच, उन्हाची तीव्रता वाढायला लागल्याने शीतपेयांच्या निर्मितीसाठी साखरेला मागणी वाढली आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:07 PM (IST)
|
नगर -  स्वबळाची भाषा, त्या अनुषंगाने झालेले आरोप-प्रत्यारोप, मंत्र्यांमधील वाक्युद्ध आणि कार्यकर्त्यांनी केलेला रात्रीचा दिवस अशा प्रकारच्या प्रचाराचा धुरळा खाली बसला आणि चालू झाली प्रशासनाची धावपळ. जिल्हा परिषदेच्या 75 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 150 जागांसाठीचे भवितव्य उद्या मतदानयंत्रात बंद होणार आहे. एरवी उमेदवारी मिळविण्यासाठी दिसणारी गर्दी यावेळी फारशी दिसलीच नाही.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:06 PM (IST)
|
नगर - जामखेडमध्ये एका धार्मिक स्थळाची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय बारकुंड व पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळत कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर तणाव निवळला. आज (ता. 7) होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:04 PM (IST)
|
नगर - डॉ. माया कोळसे यांना उमेदवारी देण्यास आपण सांगितले होते परंतु त्यांच्या बेलापूर गटात साई संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली, असा थेट गंभीर आरोप माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी आज केला! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावरही टीकेची तोफ डागत त्यांनी घरचा आहेर दिला.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:02 PM (IST)
|
तासगाव - आक्रमक भाषणे करून आणि शिवीगाळ करून विकास होत नसतो हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य कॉंग्रेसलाच अधिक लागू पडते. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मार्गदर्शन करण्याऐवजी उद्योगमंत्री नारायण राणे यांनाच सल्ला द्यावा, त्यांनाच त्याची खरी गरज आहे, असा टोला गृहमंत्री आर. आर. पाटील यांना लगावला. ते म्हणाले, ""जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही सर्वांत जास्त जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असतील.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 07:00 PM (IST)
|
कोरेगाव - सातारारोड जिल्हा परिषद गटाचे कॉंग्रेसचे उमेदवार अविनाश फाळके यांना बंदुकीचा धाक दाखवून मतदारसंघात फिरण्यास मज्जाव करण्याचा प्रकार आज सायंकाळी अंबवडे (ता. कोरेगाव) येथील पुलावर घडला. त्यामुळे फाळके यांच्या समर्थकांनी अंबवडे गावात त्यांना अटकाव करून पोलिसांना बोलावले. संबंधितांना चौकशीसाठी कोरेगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे चौकशी सुरू होती.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 06:58 PM (IST)
|
सातारा - जिल्हा परिषदेचे 65 गट व पंचायत समित्यांच्या 130 गणांसाठी जिल्ह्यात आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया होत आहे. एकूण 3056 केंद्रांवर 19 लाख 23 हजार 379 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. येळगाव गट, तसेच पंचायत समितीचे अंबवडे, अपशिंगे हे गट माघारी वेळी बिनविरोध झाले आहेत, तसेच नागठाणे गट, गण व अतीत गणिताचे मतदान 12 फेब्रुवारीला होणार आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 06:57 PM (IST)
|
कऱ्हाड - ""आक्रमक भाषण किंवा शिवीगाळ करून विकास होत नाही. त्यासाठी नियोजन हवे. ते फक्त कॉंग्रेसच देऊ शकते. त्यामुळे वैयक्तिक टीका करून सामान्यांचा विकास होणार नाही,'' अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कोणाचेही नाव न घेता आज पत्रकार परिषदेत केली. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांना विरोध केल्याचा आरोप होत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ""कॉंग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांना तो त्रास होतो.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 06:56 PM (IST)
|
सातारा - प्रलोभने, आमिषे, अर्थपूर्ण देवघेव होऊन प्रचार काळात विजयाची जुळवून आणलेली समीकरणे विस्कटू नयेत, म्हणून विविध उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आजची (सोमवार) रात्र जागवली. मात्र, तरीही अनेक ठिकाणी "अर्थपूर्ण' भेटीगाठी झाल्याची चर्चाही सुरू राहिली. मतदानाची वेळ जवळ येईल तसे मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे प्रकार घडले. पैसे, साड्या, मद्याचे वाटप विविध ठिकाणी झाल्याची चर्चा सुरू होती.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 09:55 PM (IST)
|
कोल्हापूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या बंदोबस्तासाठी कर्नाटकातील पोलिस फौजफाटा जिल्ह्यात दाखल झाला. राज्यातील बहुंताश जिल्ह्यात निवडणुका असल्याने कर्नाटकातील राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी दाखल झाल्या आहेत. आज जिल्ह्यातील 2900 केंद्रांवरील पोलिस बंदोबस्त रवाना झाला. तत्पूर्वी, सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात एकत्रित करून पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी सूचना दिल्या.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 09:40 PM (IST)
|
कोल्हापूर - मोटारसायकलवरून भरधाव येऊन महिलांच्या गळ्यांतील दागिने पळविणाऱ्या तिघा चोरट्यांना करवीर पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. अटक केलेले पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगार असून सारंग गणपती चव्हाण (वय 26), रघुनाथ बबन कांबळे (32, दोघे रा. सांगरूळ) आणि गणेश विलास कलकुटकी (19 रा. एस. टी. सरनाईकनगर, रायगड कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोटारसायकलीही जप्त केल्या.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 09:40 PM (IST)
|
कामेरी - कॉंग्रेसने सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून कामेरी पंचायत समितीचा चेहरामोहरा बदलू, असे मत कॉंग्रेस पक्षाने कामेरी पंचायत समिती गणाचे उमेदवार आनंदराव भीमराव पाटील यांनी दै. "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. श्री.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 09:25 PM (IST)
|
माडग्याळ - उमदी जिल्हा परिषद मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. पाच वर्षांत अनेक योजना व कल्पना राबविण्याचा मानस आहे. ग्रामीण भागाचा विकास हा एकच ध्यास आहे. परिसरातील कच्चे रस्ते पक्के रस्ते करणार आहे. उमदी व करजगी पंचायत समितीच्या गणात विविध योजना राबविणार आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार रेश्माक्का होर्तीकर यांनी सकाळा दिली. त्या म्हणाल्या, "" माझे बंधू जिल्हा परिषद सदस्य ऍड.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 09:25 PM (IST)
|
सातारा - खुल्या अर्थव्यवस्थेने देशाला संकटाच्या खाईत टाकले आहे. या व्यवस्थेला सर्वांत प्रथम भारतीय मजदूर संघानेच विरोध केला होता. गरिबांना जास्त गरीब करण्याचे पाप शासनाच्या डोक्यात असून, एकूणच कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात सर्वांनी पेटून उठले पाहिजे, असे मत भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटनमंत्री के. सी. मिश्रा यांनी व्यक्त केले.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 09:10 PM (IST)
|
काले -ज्ञानाचा अहंकार म्हणजे रावण व ज्ञानाचे आचरण म्हणजे प्रभू रामचंद्र होय. चांगल्या व वाईट गुणांनी माणसाची समाजात ओळख निर्माण होते. त्याच्या स्वभावाने व चांगल्या गुणाने समाजातील व्यवहार बनत असतो. अत्याचार, अहंकार, लोभ, ईर्षा, भेसळ या गुलामगिरीतून तरुणांनी सद्गुणांची कास धरावी व राष्ट्राची शक्ती बळकट करावी, असे आवाहन सद्गुरू भैय्युजी महाराज यांनी व्यक्त केले.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|