Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
मुख्य पान  >> 

विदर्भ


Monday, February 06 AT 09:55 PM (IST)
नागपूर - जिल्हापरिषद व पंचायत समितीसाठी उद्या (ता. 7) होणाऱ्या मतदानासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्थानिक सुटी जाहीर केली. गुरुवारी (ता. 16) नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होत असल्याने नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी स्थानिक सुटी राहील. हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि बॅंकांसाठी लागू होणार नाही.
Monday, February 06 AT 09:40 PM (IST)
अमरावती - महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या पत्नीचा प्रचार करणे भातकुली पंचायत समितीचे सांख्यिकी अधिकारी संजय खारकर यांना चांगलेच भोवले असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या काळात त्यांना वरूड मुख्यालय देण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात प्रचारात सहभागी झाल्यानंतर निलंबनासारखी कारवाई झालेले खारकर हे जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत.
Monday, February 06 AT 09:40 PM (IST)
नागपूर - नव्या "अग्निपथ' या चित्रपटातील "ओ सैंया' या गाण्याचा वाद सोडविण्यात जिल्हा न्यायालयाने सुचविलेली मध्यस्थी प्रक्रिया आज अपयशी ठरली. या प्रकियेत दोन्ही पक्षांनी माघार न घेता आपला दावा न सोडल्याने यातून काहीच निष्पन्न झाले नाही. ही प्रक्रिया अपयशी ठरल्याने आता हा वाद पुन्हा एकदा जिल्हा न्यायालयात गेला आहे.
Monday, February 06 AT 09:40 PM (IST)
गोरेगाव -प्रत्येक व्यक्ती कलावंत असतो, त्याने आपल्यातील कलेची उपासना करून आतल्या कलावंताला जागृत केले पाहिजे. कलेची उपासना करणे हेच कलावंताचे आद्यकर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्रा. माणिक गेडाम यांनी केले. येथील जगत कला, वाणिज्य आणि इं. ह. पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे मराठी वाङमय मंडळाचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एच. भैरम, तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. सी.
Monday, February 06 AT 09:25 PM (IST)
गडचिरोली - निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान घेण्यात येत असून, जिल्हापरिषदेच्या 33 जागांसाठी 203 तर पंचायत समितीच्या 66 जागांसाठी 373 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून, मंगळवारी (ता. सात) निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी नक्षलग्रस्त भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, आज (ता.
Monday, February 06 AT 09:01 AM (IST)
खास प्रतिनिधीअग्निशामक विभागाचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय इमारतीत राहण्याची परवानगी देणे गैरकायदेशीर असताना सुद्धा नागपूरसारख्या महानगरातील अनेक बहुमजली इमारतींकडे हे प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुमजली इमारतीने वेढलेल्या या शहरात फक्त ६७ इमारतींनाच अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमुळे उघड झाले आहे. ...
Monday, February 06 AT 09:01 AM (IST)
आज मतदानखास प्रतिनिधी - मंगळवार, ७ फेब्रुवारी २०१२विदर्भातील सात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह राज्यातील २७ जिल्हा परिषदांमध्ये मंगळवारी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकीत विशेषत: मुंबईवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केल्याने बडय़ा नेत्यांचे ग्रामीण राजकारणाकडे यंदा पार दुर्लक्ष झाले. परिणामी अपेक्षित प्रचार तोफाही थडाडल्या नाहीत. ...
Monday, February 06 AT 09:00 AM (IST)
आघाडी-युतीत बंडखोरांची खदखदखास प्रतिनिधीमहापालिका निवडणुकीत समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात नेत्यांमध्ये झालेली रस्सीखेच आणि त्यातून उफाळून आलेली खदखद कायम असल्याने आघाडी आणि युतीच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. बंडखोरांची मनधरणी सुरू असली तरी अखेपर्यंत हा त्रासही उमेदवारांसमोर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
Monday, February 06 AT 09:00 AM (IST)
प्रतिनिधीदहावी आणि बारावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावरील कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी विविध कडक धोरण अवलंबिले असून ज्या केंद्रावर कॉपीचे प्रकार आढळून आले त्या केंद्रावरील विद्यार्थ्यांसह वर्गावर असणाऱ्या शिक्षकांवरसुद्धा कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Monday, February 06 AT 08:59 AM (IST)
आर्थिक मदतीची मागणीप्रतिनिधी कळमना परिसरातील चिखली लेआऊटमधील सहा मजली इमारत सोमवारी, ३० जानेवारीला सायंकाळी कोसळल्यानंतर प्रशासनाने विविध यंत्रसामुग्री कामाला लावल्यावर शनिवारी दुपारी म्हणजे सहाव्या दिवशी इमारतीचा मलबा हटविण्याचे काम पूर्ण झाले. या इमारतीखाली सतरा मृतदेह निघाल्यानंतर इमारत मालकांवर कारवाई होऊन त्याला सजा होईल किंवा तो बाहेरही येईल, पण या ढिगाऱ्याखाली मृत्युमुखी पडलेल्या सतरा कुटुंबीयांचे काय.? ...
Monday, February 06 AT 08:59 AM (IST)
मध्यस्थीचा  प्रयोग फसलाप्रतिनिधी‘अग्निपथ’ चित्रपटातील गाण्याबाबत झालेला वाद मध्यस्थाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयोग फसला असून आता हा वाद न्यायालयातूनच सोडवावा लागणार आहे.आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील एक गाणे वादग्रस्त ठरले आहे. ...
Monday, February 06 AT 08:55 AM (IST)
प्रतिनिधी नागपूर शहरात ऑटो रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शेअर प्रवास भाडय़ास प्रादेशिक परिवहन खात्याने परवानगी दिली आहे. ऑटो रिक्षास मीटर सक्ती असली तरी कधी ऑटो रिक्षा चालकांच्या असहकार्यामुळे ही योजना नागपूर शहरात कधीच यशस्वी झालेली नाही. ...
Monday, February 06 AT 08:50 AM (IST)
बुलढाणा / प्रतिनिधी - मंगळवार, ७ फेब्रुवारी २०१२गेल्या कित्येक वषारंपासून मेहकर तालुक्यातील पाचला हे गाव विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे, परंतु आजपर्यंत एकाही नेत्याने समस्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी, हे गाव शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. त्यामुळे थेट ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या निवडणुकींवर बहिष्कार टाकून प्रचार करणाऱ्या उमेदवाराला गावात बंदी घातली आहे.
Monday, February 06 AT 08:49 AM (IST)
वर्धा / प्रतिनिधीउद्या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानावर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हिंगणघाट तालुक्याच्या दोन गावातील मतदारांनी बहिष्कार टाकल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. उद्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. ...
Monday, February 06 AT 08:49 AM (IST)
जोरदार मोर्चेबांधणीचंद्रपूर / खास प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक उमेदवारांपेक्षा जिल्ह्य़ातील आमदारांनीच प्रतिष्ठेची केली असून आपापल्या क्षेत्रातून जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.   ...
Monday, February 06 AT 08:48 AM (IST)
प्रचाराला वेगमहापालिका निवडणूकअमरावती / प्रतिनिधी अमरावती महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान पक्षचिन्हाचा विषयदेखील चर्चेत आला आहे. नव्याने स्थापन झालेल्या जनविकास काँग्रेस आणि जनकल्याण आघाडीला एकच पक्षचिन्ह मिळणार काय हा औत्सुक्याचा विषय होता, पण निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी एकाच प्रभागातील दोन जागांसाठी जनविकास-जनकल्याण आघाडीच्या उमेदवारांना वेगवेगळी पक्षचिन्हे बहाल केल्याने आघाडीच्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला. ...
Monday, February 06 AT 08:47 AM (IST)
अकोला / प्रतिनिधी अमरावती विभागातील उच्च शिक्षणाच्या सहसंचालक कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ढेपाळले आहे. या कार्यालयातील कारभार तात्काळ सुधारण्याची गरज असून अन्यथा या विरोधात ठोस भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा विधान परिषदेचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी येथे व्यक्त केले. या संबंधी राज्य शासनाकडे रितसर तक्रार करण्यात येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. राज्याच्या उच्च शिक्षणमंत्र्यांकडे याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
Monday, February 06 AT 08:47 AM (IST)
महापालिका निवडणूकअकोला / प्रतिनिधी आज अकोला महापालिकेत अपक्षांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांना निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले चिन्हांचे आरक्षण असल्याने अपक्षांना चिन्ह वाटप करण्याचे काम आज करण्यात आले. ...
Monday, February 06 AT 08:46 AM (IST)
गोंदिया / वार्ताहर महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या वतीने येथील आयसीटी सभागृहात कविसंमेलन पार पडले. यावेळी अनेक कवींनी गीते, गझलांद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उद्घाटन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते, हाजी मुमताजुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी सूरज गुप्ता, हुकूमचंद अग्रवाल, अहमद लालानी, कुदबुद्दीन सोलंकी, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे सदस्य हसन आसी व रशीद निशात उपस्थित होते. ...
Monday, February 06 AT 08:46 AM (IST)
बुलढाणा / प्रतिनिधी खामगांव येथील शहीद भगतसिंग स्मारकाचे सौदर्यीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम हडप केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी या कामाचे बिल पालिकेतून निघाले, मात्र काम झालेच नसल्याने तत्कालीन कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकाळात झालेल्या या प्रकरणाला भाजप शहराध्यक्ष शेखर पुरोहित यांनी वाचा फोडली आहे. ...
Monday, February 06 AT 08:45 AM (IST)
बुलढाणा / प्रतिनिधीलोणार तालुक्यातील कोयाळी-उदनापूर येथील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाजल योजने अंतर्गत सुमारे ६४ लाख रुपये खर्च केले, परंतु ही योजना केवळ मृगजळ ठरली आहे. त्यामुळे ही दोन्ही गावे अद्याप तहानलेलीच आहेत.   ...
Monday, February 06 AT 08:45 AM (IST)
यवतमाळ / वार्ताहरमहाराष्ट्रासह इतर राज्यात आपला आगळावेगळा ठसा उमटवणारे प्रसिद्ध इस्लामी विचारवंत, वक्ते व अजातशत्रू मौलाना काजी बशिरोद्दीन यांचे हृदयविकाराने काल निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात ५ मुली, ४ मुलगे, पत्नी, भावंडे, नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे. ते पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. अचानक हा प्रकार घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ...
Monday, February 06 AT 01:09 PM (IST)
चंद्रभागेचं वाळवंट वारकऱ्यांनी तुडुंब भरलं होतं. अबीर-बुक्‍क्‍याच्या छताखाली दिंड्या, पालख्या जमू लागल्या. "जय जय रामकृष्ण हरी'च्या गजरात हृदयाबरोबर पायांचा ठेका नकळत पडू लागला. वारकऱ्यांचा आनंद हळूहळू वाढतच होता. नदीकाठच्या झाडांनाही डोलावसं वाटू लागलं. झेंडे, पताका, ध्वज एकमेकांत मिसळून ऊरभेटीचा आनंद व्यक्‍त करू लागले. उद्या कार्तिकी एकादशी. विठूच्या दर्शनासाठी भक्‍तांची मांदियाळी अपूर्व उत्साहात होती.
Monday, February 06 AT 01:04 PM (IST)
निवडणुका आल्या की, सर्वांत जास्त धांदल उडते ती फ्लेक्‍स प्रिंटिंग करणाऱ्यांची. अशा प्रकारच्या दुकानांमध्ये कित्येकदा निरनिराळ्या पक्षांचे डिझाइन्स तयारच असतात. चेहरे बदलले आणि थोडाबहुत फरक केला की प्रचारासाठी मटेरिअल तयार. तासाभरात आणि अतिशय स्वस्तात आठ-दहा फुटांचे बॅनर आरामात तयार होऊ शकते. निवडणुकीच्या दिवसांत अशी दुकानं रात्ररात्रं सुरू असतात.
Monday, February 06 AT 07:32 AM (IST)
साहित्य व कलेपासून पाल्यांना तोडू नका, साहित्याने माणसे घडत असली तरी यंत्रयुगात यंत्रांची निर्मिती करायची की सुसंस्कृत माणसांची आणि साहित्याची हे ठरवण्याची वेळ आली आहे, असा प्रश्न समारोपाच्या भाषणात उपस्थित करून संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी सर्वांनाच विचार करायला भाग पाडले.