Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
Friday, May 18 AT 06:59 AM (IST)
नवी दिल्ली- पंचतारांकित हॉटेलमधील एका बारमध्ये विदेशी महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी रॉयल चॅलेंजर्सचा खेळाडू लूक पॉमर्शबॅक याला आज (शुक्रवार) दिल्ली पोलिसांनी अटक केली.
Friday, May 18 AT 06:38 AM (IST)
नव्या पद्धतींचा अवलंब करीत ओम क्रीडा प्रबोधिनीने यंदा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या कबड्डी प्रशिक्षणाचा समारोप नुकताच नगरसेवक नाना आंबोले यांच्या उपस्थितीत झाला.
Friday, May 18 AT 06:38 AM (IST)
आयपीएल-५च्या विवादांची मालिका यंदा थांबण्याचे नाव घेत नाही असे चित्र आहे. कारण रॉयल चॅलेंजर बंगळुरू (आरसीबी) संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडू ल्यूक पॉमर्शबॅक याने गुरुवारी रात्री सुरू असलेल्या विजयोत्सवाच्या पार्टीत एका विदेशी महिचेची छेड काढल्याबद्दल आणि तिच्या प्रियकराला मारहाण केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Friday, May 18 AT 06:38 AM (IST)
यशोधरा डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाऊंडेशन सांगली आणि युवक मराठा क्रीडा संस्थेच्या विद्यमाने झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत एअर इंडियाने बाजी मारली. महिलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याच्या सुवर्णयुगने ही किमया साधली.
Friday, May 18 AT 06:38 AM (IST)
जागतिक बु​​ध्दिबळ अजिंक्यपदाच्या लढतीतील विश्वनाथन आनंद आणि बोरिस गेलफंड यांच्यातील पाचवा डाव २६ चालीनंतर बरोबरीत सुटला. पाच डावांनंतर आनंद,गेलफंडच्या खात्यात प्रत्येकी अडीच गुण जमा आहेत.
Friday, May 18 AT 06:38 AM (IST)
विस्डेन ट्रॉफी कसोटी मा​लिकेतील इंग्लंडविरूध्द लॉर्ड्सच्या सलामीच्या कसोटीत पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने ९ बाद २४३ धावा केल्या. दिवसअखेरीस चंदरपॉलने १७५ चेंडूत डझनभर चौकारांसह नाबाद ८७ धावा केल्या.
Friday, May 18 AT 06:38 AM (IST)
आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणानंतर भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी या कथित फिक्सिंगमागची कारणे सांगताना म्हटले आहे की, सर्व खेळाडूंना लिलावासाठी विचारात घेतले जात नसल्यामुळे या भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते, त्यामुळेच काळया पैशाचे व्यवहार होतात.
Friday, May 18 AT 06:38 AM (IST)
‘धावपळीच्या आयुष्यात आता कसोटी सामने पाहणे प्रत्येकालाच शक्य नाही. एखादा चित्रपट जसा तीन तास एन्जॉय करून लोक त्यांच्या पुढच्या कामाला लागतात, तसेच आयपीएलचे आहे.’ - छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री
Friday, May 18 AT 06:38 AM (IST)
कर्णधार, यष्टिरक्षक अॅडम गिलक्रिस्टचे पुनरागमन किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी शुभशकन ठरले. यष्टीमागे चार अप्रतिम झेल टिपणा-या अॅडम गिलक्रिस्टने मनदीपसह सलामीला येत नाबाद ६४ धावा चोपून काढल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने गतवेळच्या विजेत्या चेन्नईवर ६ गडी आणि २१ चेंडू राखून सफाईदर विजय मिळवला.
Friday, May 18 AT 06:38 AM (IST)
शाहरुख खानने बुधवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर केलेल्या कृत्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शाहरुखवर वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेशबंदी करण्याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.
Thursday, May 17 AT 09:10 PM (IST)
धर्मशाला - किंग्ज इलेव्हन पंजाबने "आयपीएल'च्या पाचव्या पर्वात गतविजेत्या चेन्नईवर सहा विकेट राखून मात केली.
Thursday, May 17 AT 08:40 PM (IST)
मुंबई - आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सनसनाटी हार पत्करावी लागली असली, तरी या स्पर्धेतील मुंबईची वाटचाल अजूनही त्यांच्याच हाती आहे.
Thursday, May 17 AT 08:25 PM (IST)
दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने आपले चौथे स्थान कायम राखले आहे.
Thursday, May 17 AT 08:25 PM (IST)
बुधवारी रात्री कोलकत्याविरुद्ध विजय मिळवून आगेकूच करण्याची अपेक्षा आम्ही बाळगली होती पण हा सामना हरल्यामुळे आता शेवटच्या लढतीसाठी आमच्यावर "करो या मरो' अशी वेळ आली आहे.
Thursday, May 17 AT 08:10 PM (IST)
बुधवारची रात्र "कॅंप 2'वर काढल्यानंतर "गिरिप्रेमी'च्या पथकाने गुरुवारी "कॅंप 3'चा टप्पा गाठण्यास प्रारंभ केला.
Thursday, May 17 AT 08:10 PM (IST)
नवी दिल्ली - क्रीडा मंत्री अजय माकन यांनी महिला तिरंदाज राणी दत्ता हिला राष्ट्रीय खेळाडू कल्याण निधीतून पाच लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे.
Thursday, May 17 AT 08:10 PM (IST)
नवी दिल्ली - इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या लिलावात सर्व खेळाडूंचा समावेश न करण्याचा निर्णय ही मोठी चूक असून, त्यामुळेच भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांची देवाण-घेवाण होण्यास चालना मिळाल्याचा साक्षात्कार आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांना झाला आहे.
Thursday, May 17 AT 08:10 PM (IST)
ऑलिंपिक स्पर्धेचे मुख्य प्रवर्तक असणाऱ्या बॅरन द कुबर्टिन यांचा सांघिक खेळांच्या ऑलिंपिकमधील समावेशाला तीव्र विरोध होता.
Thursday, May 17 AT 08:10 PM (IST)
रोम - अमेरिकेच्या अनुभवी महिला खेळाडू व्हिनस आणि सेरेना या विल्यम्स भगिनींनी रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत आपली विजयी आगेकूच कायम राखताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
Thursday, May 17 AT 07:55 PM (IST)
मॉस्को - जगज्जेत्या विश्‍वनाथन आनंदला जागतिक बुद्धिबळमधील विजेतेपदाचा आव्हानवीर बोरिस गेलफंडविरुद्धच्या लढतीत पुन्हा एकदा भक्कम स्थितीचा फायदा घेण्यात अपयश आले.
Thursday, May 17 AT 07:40 PM (IST)
पुणे - पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना आयोजित आंतरक्‍लब टेबल टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेस उद्यापासून (ता.
Thursday, May 17 AT 07:40 PM (IST)
पुणे - डेरॉन "फाईव्ह अ साईड' फुटबॉल स्पर्धेत प्रतिक बहिरटने केलेल्या दोन गोलच्या जोरावर 96 के-बी संघाने बिटेल्सि संघाचा दोन गोलनी पराभव केला.
Thursday, May 17 AT 07:40 PM (IST)
पुणे - पुणे जिल्हा क्रिकेट संघटना (पीडीसीए) आयोजित महिला गटाच्या वासंतिक साखळी क्रिकेट स्पर्धेत पीडीसीए इलेव्हनने नूतन मराठी विद्यालयाचा (नूमवि) आठ गडी राखून पराभव केला.
Thursday, May 17 AT 07:40 PM (IST)
पुणे - पुणे जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित प्रथम श्रेणी गटाच्या अव्वल साखळी फुटबॉल स्पर्धेत गॉड्रीन गोनमीने दीपक साळवीच्या पासवर 22 व्या मिनिटास केलेल्या गोलच्या जोरावर बिशप फुटबॉल क्‍लबने संगम यंग बॉईज "क' संघाचा पराभव केला.
Thursday, May 17 AT 07:40 PM (IST)
पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) आयोजित तिसऱ्या डीईएस फर्ग्युसन करंडक पुरुष गटाच्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत पुण्याच्या बिगरमानांकित खेळाडू रोहन गिडेने पुण्याच्याच प्रथम मानांकित व गतविजेत्या नितीन कीर्तनेचा चुरशीच्या सामन्यात 3-6, 7-5, 6-3 असा पराभव करून उपांत्यफेरी गाठली.