Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
Friday, May 18 AT 11:25 PM (IST)
मुंबई -  उच्च शिक्षणासाठी "ईबीसी' म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांची उत्पन्न मर्यादा वार्षिक एक लाख रुपये करण्याची घोषणा नुकतीच उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्र्यांनी केली.
Friday, May 18 AT 11:10 PM (IST)
कल्याण -  कौटुंबिक वादातून पोटच्या दोन मुलांची गळा चिरून हत्या केल्यानंतर एका व्यक्तीने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरात उघडकीस आली.
Friday, May 18 AT 11:10 PM (IST)
मुंबई - गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घराची किंमत साडेसात लाख रुपये ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे.
Friday, May 18 AT 11:10 PM (IST)
मुंबई -  मुंबईत राहणाऱ्या पण जकात वाचवण्यासाठी शहराबाहेर वाहनांची नोंदणी करणाऱ्यांवर महापालिकेच्या कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे.
Friday, May 18 AT 10:55 PM (IST)
मुंबई -  प्रतिभावान युवा शास्त्रीय संगीत कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी "पंचम निषाद' संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा "आरोही' महोत्सव यंदा 25 आणि 26 मे रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात रंगणार आहे.
Friday, May 18 AT 10:55 PM (IST)
कल्याण  - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत चार अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात पालिका प्रशासनाकडून दिरंगाई करण्यात आली.
Friday, May 18 AT 10:55 PM (IST)
मुंबई -  सोशल नेटवर्किंग साईटवर संचार असलेल्या नेटकराने विनंती केल्यास त्याच्या इंटरनेट वापराच्या सवयी "ट्रॅक' करणार नाही, अशी घोषणा "ट्‌विटर'ने केली आहे.
Friday, May 18 AT 10:55 PM (IST)
मुंबई -  राज्य सरकार 2012-13 च्या वार्षिक योजनेच्या आकारमानाबाबत नियोजन आयोगाशी 29 मे रोजी चर्चा करणार आहे.
Friday, May 18 AT 10:40 PM (IST)
मुंबई -  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची सात टक्के महागाई भत्तावाढीची थकबाकी अद्याप मिळालेली नाही.
Friday, May 18 AT 10:40 PM (IST)
उल्हासनगर -  यापूर्वी खासदारकी, आमदारकी, नगराध्यक्षपद, तसेच नगरसेवकपद भूषविणारे अपक्ष नगरसेवक पप्पू कलानी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
Friday, May 18 AT 10:25 PM (IST)
मुंबई -  दादर येथील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मृत्यूचा ठपका असलेले मुंबई पालिकेचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांना पालिका प्रशासनाने क्‍लीन चिट दिली आहे.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच जोरात सुरू आहे.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
मोबाइल टॉवरच्या किरणोत्सर्गाची जोखीम तपासून ग्रामविकास खात्यातर्फे ग्रामीण भागांतील मोबाइल टॉवरसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील, असे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
राज्यातील सर्व शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना २५ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. मात्र त्यांच्या फीचा मर्यादीत हिस्साच सरकार देणार असल्यामुळे संस्थाचालक आणि पालकांमध्ये संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. काही शाळा अडचणीत सापडण्याचाही धोका आहे.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
'महापालिकेत ७५ जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र गटबाजी आणि गद्दारीमुळे वाताहात झाली. मला बाहेरच्यांपेक्षा पक्षातच सर्वाधिक शत्रू आहेत. माझ्याच लोकांनी माझे अंदाज चुकवले', असा उद्वेग मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांच्या मेळाव्यात व्यक्त केल्याचे कळते.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
राज्य निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त नंदलाल यांना सहाव्या वेतन आयोगानुसार देय असलेल्या थकित भत्त्याची रक्कम अदा करावी, असा आदेश राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी सामान्य प्रशासन खात्याचे प्रधान सचिव सुमित मल्लिक यांना दिला आहे.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
बहुमजली टॉवर आणि कॉर्पोरेट ऑफिसच्या गर्दीत मुंबई शहरातील मैदाने शाबूत रहावीत आणि त्यावर तरुणांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी बृहन्मुंबई क्रीडा प्राधिकरण स्थापण्यात येणार आहे.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
काळोखात चमकणाऱ्या पण न दिसणाऱ्या काजव्याची भूमिका माझ्या वाट्याला आली, पण ती मी प्रमाणिकपणे जगलो. खरा आनंद आणि सहन न होणारं दु:ख यांचं गाठोडं घेऊन उभा राहिलो. जीवनरस प्रामाणिकपणे शिंपत राहिलो आणि त्यातून जे उगवलं ते लिहून काढलं, अशा प्रांजळ शब्दांत ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांनी आपलं मनोगत मांडले.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
हिट अँड रन केसमधील आरोपी नूरिया हवेलीवाला हिला अमेरिकेत जाण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
ट्रायने टीव्ही चॅनेलसाठी एका तासात १२ मिनिटे जाहिराती असे बंधन निश्चित केले आहे. या आणि अशा निर्णयांचा टेलिव्हिजन क्षेत्रावर होणा-या परिणामाविषयी 'स्टार माझा' वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी मांडलेली भूमिका.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्याकरिता प्रति क्विंटल ५० ते १०० रुपयांप्रमाणे जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर प्रलंबित आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर १५० कोटी रुपयांपर्यंतचा बोजा अपेक्षित आहे.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
राज्यात केवळ १५ तालुक्यांतच पाण्याची पातळी खाली गेलेली नाही. त्यामुळे अन्य तालुक्यांनाही निधी मिळाला पाहिजे, या मागणीकरिता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संख्या १००पेक्षा अधिक करण्याचे मिशन राबविण्यासाठी पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ जूनला मुंबईत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होईल.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
लोकलमध्ये चालणाऱ्या स्टंटबाजीत बुधवारी एका निष्पाप तरुण प्रवाशास प्राण गमवावे लागले. त्याच्या मृत्यूसाठी दोषी असणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Friday, May 18 AT 06:48 AM (IST)
महिलेचे शील ही मालमत्ता होऊ शकत नाही, लग्नापूर्वी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले असतील तर बलात्काराच्या खटल्यातील आरोपीचा जामीन फेटाळता येणार नाही, असे मत नोंदवत मुंबई हायकोर्टाने रेल्वेतल्या एका कर्मचा-याला बलात्कार व फसवणुकीच्या खटल्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला.