Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
Friday, May 18 AT 10:55 PM (IST)
न्यूयॉर्क -  फेसबुक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइटची प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) सुरू झाली असून, त्याद्वारे तब्बल सोळा अब्ज डॉलर उभारले जाणार आहेत.
Friday, May 18 AT 10:25 PM (IST)
नवी दिल्ली (पीटीआय)  - बॅंकेचे कर्ज योग्य वेळी न फेडणाऱ्या तसेच ते बुडवणाऱ्या कर्जदारांना पाठीशी न घालण्याचा किंवा त्यांच्या कर्जांची पुनर्रचना न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Friday, May 18 AT 09:55 PM (IST)
मुंबई  - इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्‍नॉलॉजी अर्थात आयसीटीमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल टाटा कम्युनिकेशन्सचा गौरव नुकताच करण्यात आला.
Friday, May 18 AT 07:40 PM (IST)
मुंबई  - ग्लोबल ऍडव्हर्टायझर्स या प्रसारमाध्यमातील कंपनीला यंदाचा कैझन इंडिया एनबीसी न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार मिळाला आहे.
Friday, May 18 AT 03:33 PM (IST)
युरोपातील वित्तीय पेचाचा प्रश्न सुटण्याची चिन्हे नसल्याने परदेशी फंडांत झालेल्या मोठ्या विक्रीमुळे मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार सेन्सेक्स दिवसाच्या सुरुवातीलाच १६ हजाराहून खाली उतरल्याने आर्थिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच दुस-याबाजूला डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भावही घसरून ५४.८५ इतका निचांक गाठला.
Friday, May 18 AT 04:33 AM (IST)
व्यवसायाच्या दृष्टीने, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या किंवा ‘सेकंड होम’ घेण्याच्या हेतूने मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा असलेल्या मुंबईकरांसाठी वरळीतील नेहरू सेंटर येथे ‘सेंट्रल इंडिया प्रॉपर्टी एक्स्पो २०१२’चे आयोजन केले आहे.
Friday, May 18 AT 04:33 AM (IST)
युरोपातील वितीय पेच सुटण्याची चिन्हे नसल्याने आणि जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १०० डॉलरवरून ९६पर्यंत घटल्याने डॉलरची मागणी वाढून गेले काही दिवस उतरणीला लागलेले रुपयाचे मूल्य गुरुवारीही घसरले व दिवसअखेर ५४.४७वर स्थिरावले.
Friday, May 18 AT 04:33 AM (IST)
‘एलआयसी’ची ‘जीवन अक्षय’ ही पहिली ऑनलाइन योजना नुकतीच दाखल झाली आहे. ‘एलआयसी’च्या ५२व्या ‘सीनिअर डिव्हिजनल मॅनेजर्स कॉन्फरन्स’मध्ये ‘आयआरडीए’चे अध्यक्ष जे. हरीनारायणन यांच्या हस्ते ही योजना दाखल करण्यात आली.
Friday, May 18 AT 04:33 AM (IST)
युरोपातील वित्तीय पेचाचा प्रश्न सुटण्याची चिन्हे नसल्याने आणि जागतिक पातळीवर कच्चे तेल प्रति बॅरल ९६ डॉलरपर्यंत घसरल्याने डॉलरला मागणी वाढली. परिणामी, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात आणखी घसरण होऊन ५४.४७ वर बंद झाला. मात्र, सत्रांतर्गत व्यवहारात रुपयाने ५४.६० पातळी गाठली होती.
Friday, May 18 AT 04:33 AM (IST)
ऑटो कंपन्यांना राज्य सरकारने देऊ केलेली व्हॅट परतावा सवलत बंद केल्याचा फटका बसत आहे. व्हॅट परताव्याच्या पेचावर उपाय निघत नसल्याने फोक्सवॅगन या जर्मन कंपनीने राज्यातील दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक स्थगित केल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.
Friday, May 18 AT 04:33 AM (IST)
भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाचे परिणाम कसे भोगावे लागत आहेत, याचेच हे बोलके उदाहरण आहे. आर्थिक सद्यस्थितीचा हा थोडक्यात आढावा.
Thursday, May 17 AT 08:40 PM (IST)
मुंबई - केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्याच्या आयातीवर शुल्कवाढ केल्यामुळे, दागिन्यांवर उत्पादन शुल्क लावल्यामुळे, याचे पर्यवसान सराफांच्या संपात झाल्यामुळे आणि रुपयाचे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सातत्याने अवमूल्यन होत असल्यामुळे सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने सांगितले आहे.
Thursday, May 17 AT 08:10 PM (IST)
"तुझं हसणं मनाला इतकं मोहून टाकतं, की तितकं अमृतसुद्धा देवांना मोहून टाकत नसेल,' असे ययातिदेवयानी नाटकात आपण ऐकले आहे आणि हीच ओळ ज्या हसण्यासाठी आहे, ते हसणे सगळ्यांना आवडते.
Thursday, May 17 AT 06:33 AM (IST)
२०११-१२ या आर्थिक वर्षात अभ्युदय बँकेला ८०.१८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक राज्यांत बँकेच्या १०५ शाखा असून एकूण व्यवसाय ११ हजार २०० कोटींच्या वर पोहचला आहे.
Thursday, May 17 AT 06:33 AM (IST)
डॉलरला मागणी वाढल्याने रुपयाच्या मूल्यात ५४.४६ इतक्या विक्रमी नीचांकापर्यंत झालेली घसरण, तसेच युरोपातील समस्येच्या प्रभाव याचा जोरदार फटका बुधवारी सेन्सेक्सला बसला.
Thursday, May 17 AT 06:33 AM (IST)
जागतिक पातळीवरील आर्थिक घडामोडींबरोबर देशांतर्गत मंदीसदृश परिस्थितीमुळे या आर्थिक वर्षासाठी ‘नॅसकॉम’ने माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राचे १४ टक्के वाढीचे ठेवलेले उद्दिष्ट ‘महत्त्वाकांक्षी’ वाटते, असे मत ‘इन्फोसिस’चे मुख्य वित्त अधिकारी व्ही. बालकृष्णन यांनी व्यक्त केले.
Thursday, May 17 AT 06:33 AM (IST)
भारतीय अर्थव्यवस्थेवर घोंघवणा-या मंदीच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकार काही नवे काटकसरीचे उपाय योजणार आहे. काही कटू निर्णय घ्यावेच लागतील, असे सूतोवाच अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी केले. मात्र त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असा दिलासाही त्यांनी दिला.
Thursday, May 17 AT 06:33 AM (IST)
आर्थिक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे त्यावर श्वेतपत्रिका काढण्याचा सरकारचा विचार नाही, असे केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत स्पष्ट करण्यात आले. सरकारकडून वेळोवळी केल्या जाणार्या धोरणात्मक घोषणांतून या सुधारणांच्या सद्यस्थितीची कल्पना येते, असे अर्थराज्यमंत्री अश्विनीकुमार यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
Thursday, May 17 AT 06:33 AM (IST)
महागाईच्या नावाने सामान्य जनता शंख करत असताना बुधवारी रुपयाने नवा नीचांक गाठला आणि शेअर बाजारही २९८ अंशानी गडगडला. अखेर मंदीच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकार कटू निर्णय घेणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिले.
Thursday, May 17 AT 06:33 AM (IST)
महागाई आणि बेरोजगारीमुळे भारताची स्थिती सध्या बिकट दिसत असली तरीही बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये अधिक सर्वसमावेशक विकासाचा विचार करण्यात आला असून, या योजनेच्या काळात उत्पादन क्षेत्रामध्ये ३० ते ४० लाख नोक-या उपलब्ध होतील अशी घोषणा सरकारने केली आहे.
Wednesday, May 16 AT 07:55 PM (IST)
पुणे - नुकत्याच झालेल्या जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अठराव्या वर्धापनदिनानिमित्त फडणीस समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विनय फडणीस यांना "उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Monday, May 14 AT 08:40 PM (IST)
नवी दिल्ली -  नव्या ड्रिमलायनर विमानासाठी प्रशिक्षण वेळापत्रकात बदल, या मूळ मागणीवरून सुरू झालेला एअर इंडिया वैमानिकांचा संप आता चिघळत चालला आहे.
Monday, May 14 AT 08:10 PM (IST)
मुंबई - चलनवाढीच्या दरात पुन्हा वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपातीची आशा मावळल्याने गुंतवणूकदारांमध्ये आज निरुत्साह होता.
Tuesday, May 15 AT 09:26 PM (IST)
अभ्युदय बँकेच्या लालबाग येथील नव्या शाखेचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष सीताराम घनदाट यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, स्थानिक नगरसेवक, बँकेचे भागधारक व ग्राहक, संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
Tuesday, May 15 AT 09:26 PM (IST)
युरोपातील शेअर बाजारातील सुधारणा आणि रुपयाची घसरण थांबल्याने शेअर बाजारात खरेदी झाल्यामुळे सलग पाच सत्रांतील घसरणीला ‘ब्रेक’ लागत सेन्सेक्स ११२.४१ अंशांनी वधारून १६,३२८.२५ अंशांवर बंद झाला.