Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
Monday, February 06 AT 08:40 PM (IST)
पुणे - जिल्हा परिषदेच्या प्रचाराची आज सांगता झाल्याने आता पुढील आठवडाभर पुणे महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत.
Monday, February 06 AT 08:25 PM (IST)
पुणे - आमदार विनायक निम्हण, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, माजी आमदार रामभाऊ मोझे यांची ताकद कॉंग्रेसच्या मागे आहे. त्यामुळे बोपोडी, औंध, बाणेर, पाषाण परिसरात कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कस लागणार आहे. दलित मतांची विभागणी या प्रभागांमधील निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. बोपोडीत राष्ट्रवादीचे नगरसेवक श्रीकांत पाटील आणि कॉंग्रेसच्या नगरसेविका शैलजा खेडेकर यांच्यातील लढत दोन्ही कॉंग्रेसच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे.
Monday, February 06 AT 08:25 PM (IST)
पिंपरी - येथील अशोक थिएटर प्रभाग क्रमांक 44 मधील निवडणूक मुद्द्यावरून गुद्द्यावर आली आहे. पुरुष प्रभागात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्येच लढत होणार आहे. महिलांमध्ये भाजप, कॉंग्रेस, शिवसेना व एक अपक्ष उमेदवार या चार उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. एकमेकांच्या विरोधात पोलिसांत खोट्या तक्रारी करून गुंतविण्याची परंपरा या वेळी सुरू आहे. शह-काटशहाच्या राजकारणात कोणाचा विजय होईल, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
Monday, February 06 AT 08:10 PM (IST)
पुणे - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 41 टक्के उमेदवार पदवीधर असून, त्यात एक अभियंता आणि तीन डॉक्‍टरांचा समावेश आहे. 21 टक्के उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून, 19 टक्के उमेदवारांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पक्षाकडून पाठविण्यात आलेल्या उमेदवारांच्या माहितीवरून ही बाब उघडकीस आली. भाजपने यंदा 76 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यापैकी 30 पदवीधर आहेत.
Monday, February 06 AT 08:10 PM (IST)
पुणे - स्वारगेट स्थानकातून चोरलेली एसटी बस बेफाम चालवून आठ नागरिकांचा बळी घेणारा चालक संतोष माने हा मनोरुग्ण नसल्याचा अहवाल मानसोपचार तज्ज्ञांच्या समितीने सोमवारी न्यायालयात सादर केला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याचे पोलिसांनी सांगितल्यामुळे माने याची येत्या ता. 18 पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, "माझ्या हातून हा प्रकार झाला नाही' असा दावा मानेने न्यायालयात केला.
Monday, February 06 AT 07:55 PM (IST)
पिंपरी - महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार देताना काही जागांवर गुणांचा निकष डावलून आयत्यावेळी उमेदवारी दिल्याने नाराजांची संख्या वाढली आहे. काहींनी बंडखोरी केली असून, काहींनी स्थानिक व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या सूचनेचा मान ठेवून माघार घेतली आहे. मात्र, पक्षांतर्गत असंतोष खदखदतोच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चिंचवड, भोसरी व निगडी अशा तीन मतदारसंघांनुसार मुलाखती घेतल्या. तसेच, सर्व इच्छुकांची लेखी परीक्षा घेतली.
Monday, February 06 AT 07:55 PM (IST)
पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी सगे-सोयरे, गुंठामंत्री, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप पक्षाच्या सहा बंडखोर उमेदवारांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (ता. 6) केला. माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, समीर मासूळकर, शिक्षण मंडळाच्या सदस्या ऍड. ऊर्मिला काळभोर, शहर राष्ट्रवादी डॉक्‍टर सेलचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास आल्हाट, माजी नगरसेविका डॉ.
Monday, February 06 AT 07:55 PM (IST)
पुणे - सकाळच्यावतीने घेण्यात आलेल्या पिअर्स प्रस्तुत बालमित्र चित्रकला स्पर्धा 2011च्या निकालाबाबत राज्यभरातील स्पर्धकांची उत्सुकता आता शिगेला पोचली असतानाच "सकाळ'ने या निकालाकरिता "एसक्‍लब वन' या खास संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. केवळ स्पर्धेचा निकालच नाही, तर पारितोषिके मिळवलेल्या मुलांच्या चित्रांचा आनंदही या संकेतस्थळावर घेता येणार आहे, आणि तोही आकर्षक भेटवस्तू मिळवण्याच्या संधीसह.
Monday, February 06 AT 07:41 PM (IST)
पुणे - भाजपच्या दबावापुढे झुकत शिवसेनेने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील आपल्या अधिकृत सहा उमेदवारांचा पाठिंबा सोमवारी काढून घेतला. पुण्यातून किशोर विटेकर, अंकुश तिडके आणि दीपाली ओसवाल, तर पिंपरी-चिंचवडमधून संगीता पवार, देवराम गावडे आणि जयश्री सुतार या उमेदवारांना पक्षाच्या ए-बी फॉर्ममुळे "धनुष्यबाण' हे चिन्ह मिळाले असले, तरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी "धनुष्यबाणा'चा प्रचार करू नये, असा आदेश आज शिवसेनेतर्फेच जारी करण्यात आला आहे.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
पुणे - ""वाहन उद्योग क्षेत्रातील मुख्य केंद्र म्हणून पुणे शहर विकसित झाले आहे. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, तरीही पारंपरिक अभ्यासक्रमांवरच भर दिला जातो. त्यामुळे शिक्षण संस्था व ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री यांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे,'' असे मत "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. संशोधन व तांत्रिक शिक्षणाबरोबरच बाजारपेठेतील वास्तवाचे विद्यार्थ्यांना ज्ञान दिले गेले पाहिजे.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने "कपबशी' हे निवडणूक चिन्ह दिले आहे, तर भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांना "पतंग' हे चिन्ह मिळाले आहे. दोन्ही पक्षांनी मागणी केल्यानुसार त्यांना ही चिन्ह मिळाली आहेत. मात्र, त्यातील एक-दोन उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे इतर चिन्ह घ्यावी लागली. रिपब्लिकन (आठवले गट) पक्ष 14 प्रभागांत निवडणूक लढवीत आहे.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ बुधवारी (ता. 8) फोडण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली. आचारसंहिता लागण्यापूर्वी 4 जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
पुणे - मनसेची परीक्षा म्हणजे केवळ स्टंटबाजी होती, असा आरोप डॉ. सायली कुलकर्णी यांनी केला तसेच प्रभाग क्रमांक 37 मधील शाखा अध्यक्षांनीही राजीनामा दिला. डॉ. कुलकर्णी यांनी प्रभाग क्रमांक 37 मधून मनसेकडे उमेदवारी मागितली होती. तांत्रिक कारणामुळे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. "विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत माझे नाव होते. ते महापालिकेच्या निवडणुकीत प्रशासकीय चुकांमुळे आले नाही.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या काळात शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 31 सराईत गुन्हेगारांना 14 दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले तसेच एकूण 408 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, 90 जणांना दररोज पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. ज्ञानेश्‍वर चव्हाण यांनी सोमवारी "सकाळ'ला दिली.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
पिंपरी - अशोक थिएटर प्रभागात राष्ट्रवादीचे दोन एबी फॉर्म आले होते. मात्र, नियमांच्या आधारे सुनीता वाघेरे यांना पिंपरीचे निवडणूक निर्णय अधिकारी दगा मोरे यांनी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. उषा वाघेरे, पूनम कापसे व सुनीता वाघेरे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीने उषा वाघेरे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे एबी फॉर्मवर पूनम कापसे यांचे नाव होते.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
पिंपरी - ""देशांतर्गत उत्पन्नात सर्वाधिक वाटा असलेल्या सेवाक्षेत्राचा विस्तार होत असल्याने अभियांत्रिकीबरोबरच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे खासगी शिक्षण संस्था आणि अभिमत विद्यापीठाबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढणे आवश्‍यक आहे,'' असे मत विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष, नॅकचे संस्थापकीय संचालक डॉ. अरुण निगवेकर यांनी व्यक्त केले. विद्यापीठ गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत येथील डॉ. डी. वाय.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
दौंड - दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यपदासाठी आज मंगळवारी (ता. 7) निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक प्रेमसुख कटारिया व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल साळवे यांच्यात लढत होत असली, तरी संख्याबळाच्या आधारावर कटारिया यांची निवड निश्‍चित आहे. उपनगराध्यक्षपदावर नगरसेविका सरस्वती काळे यांची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. दौंड नगरपालिका कार्यालयात कटारिया व साळवे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. काल (ता.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
बारामती - बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयश्री सदाशिव सातव यांची निवड निश्‍चित झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी सातव यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्‍चित झाली असून, त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. नगरपालिकेत सोमवारी (ता. 6) सकाळी नगरसेवकांची बैठक झाली.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
तळेगाव दाभाडे - "शिक्षण मंडळ निवडणुकीकरिता उमेदवार निश्‍चित करताना निवड समितीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपला विश्‍वासघात केला. मनमानी करून उमेदवारी अर्ज दाखल केले,' असा आरोप तळेगाव शहर कॉंग्रेस अध्यक्ष यादवेंद्र खळदे यांनी केला आहे. नेत्यांच्या कपटी वागणुकीचा त्यांनी निषेधही केला आहे.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रिंगणात थेरगाव परिसरातील चार उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग बारणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका झामाबाई बारणे, मनोहर पवार यांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली. संपत्तीच्या क्रमवारीत अव्वलस्थानी श्रीरंग बारणे (प्रभाग 51-अ) आहेत.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
पुणे - खासगी आस्थापना, उद्योगांमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी त्यांना पगारी सुटी देण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. राज्यात महापालिकांसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या दिवशी दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार आणि उद्योगांतील कामगारांना मतदान करण्यासाठी पगारी सुटी देण्यात यावी, असा आदेश उद्योग, ऊर्जा आणि कामगार मंत्रालयाने काढला आहे.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
दौंड - लिंगनिदान करून स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्‍टरांची संघटित साखळी ही दहशतवाद्यांपेक्षा क्रूर आहे. समाजातील अशा अपप्रवृत्तींच्याविरुद्ध माझा लढा असून नागरिकांनी मला साथ द्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी केले. शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयात स्वर्गीय रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण देशपांडे यांच्या हस्ते झाले. "लेक वाचवा - देश वाचवा' या विषयावर त्या बोलत होत्या. नेत्रतज्ज्ञ डॉ.
Monday, February 06 AT 07:40 PM (IST)
पुणे - महापालिका निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने आजपासून (ता. 7) सोमवारपर्यंत (ता. 13) शहरातील विविध भागांतून "मतदान पदयात्रा' काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या वेळी उमेदवारांकडून जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.
Monday, February 06 AT 11:33 PM (IST)
'दिवसेंदिवस सर्व्हिस सेक्टर वाढत असल्यामुळे इंजिनीअरिंग बरोबरच आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे खासगी शिक्षण, संस्था आणि अभिमत विद्यापीठांबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढणे आवश्यक आहे,' असे मत विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी व्यक्त केले.
Monday, February 06 AT 11:33 PM (IST)
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी येत्या 16 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.