|
Monday, February 06 AT 11:08 PM (IST)
|
टीबीसाठी पूर्ण उपचार उपलब्ध झाले असले तरी औषधांना दाद देत नसलेल्या टीबी पेशंटची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे समोर येत आहे. टीबीची चाचणी होत असलेल्या सातपैकी तीन प्रयोगशाळांकडून पालिकेला माहिती मिळाली असून ही संख्या केवळ हिमनगाचे टोक असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 11:08 PM (IST)
|
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक गाजलेल्या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मातोश्री व बॅरिस्टर देवरा निकम यांच्या पत्नी व स्वातंत्र्यसैनिक विमलादेवी निकम यांचे सोमवारी सकाळी जळगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 11:08 PM (IST)
|
राज्यातील जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकांच्या मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला 'नो व्होट' पॅनेल जोडणे या टप्प्यात अशक्य असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी हायकोर्टाला दिली.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 11:08 PM (IST)
|
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदारयाद्यांमध्ये काही चुका आढळून आल्या असून काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त यांनाच त्याचा फटका बसला आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 11:08 PM (IST)
|
हिंदी चित्रपटातील नेहमीचा डायलॉग अगदी गुळगुळीत झाला आहे. ... प्यार करना गुनाह नही... !, मात्र हेच शब्दा एका खटल्याच्या निमित्ताने सोमवारी हायकोर्टाने काढले.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 11:08 PM (IST)
|
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांची क्षमता वाढवण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने मान्यता दिल्याने मुंबईच्या वेशीपर्यंत आलेले लोडशेडिंगचे संकट तूर्तास टळले असल्याने मुंबैकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 11:08 PM (IST)
|
जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रचारात परस्परांवर दुगण्या झाडणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना मुंबईतील प्रचारासाठी एकत्र यावे लागत असून, येत्या गुरुवारी ९ फेब्रुवारीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंदीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका व्यासपीठावर येणार आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 11:08 PM (IST)
|
पश्चिम रेल्वेवरील 'डीसी-एसी' परिवर्तन रविवारी पूर्ण झाल्यानंतर उपनगरीय लोकल सेवा अधिक वेगवान होण्याचे संकेत मिळत असतानाच अवघ्या २४ तासांत दोनदा ओव्हरहेड वायर तुटण्याचे प्रकार झाले.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 11:08 PM (IST)
|
रेल्वे तिकिटांसाठी खिडक्यांवर प्रचंड गदीर्मुळे कंटाळणाऱ्या प्रवाशांना यापुढे थेट रेल्वे पुलांवर (एफओबी) तिकीट काढता येतील.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 11:08 PM (IST)
|
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एमएमआरडीए मैदानावरील प्रचारसभेची जय्यत तयारी सुरू असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कुठे होणार याबाबत सुस्पष्टता नसल्याने पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी चिंतेत आहेत.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 10:25 PM (IST)
|
ठाणे-  मुंबईसह ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचा हंगाम सुरू असल्याने बनावट नोटांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डुप्लिकेट नोटांपाठोपाठ निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या तळीरामांनाही बनावट मद्य दिले जात आहे. नॉनव्हेजवर ताव मारणाऱ्या खवय्यांची संख्या लक्षात घेऊन भेसळयुक्त मांसाचे प्रमाणही वाढले असून "डुप्लिकेट' मेजवान्यांची चंगळ उडवून दिली जात आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 10:10 PM (IST)
|
उल्हासनगर - उल्हासनगर पालिकेतील पॅनेल क्रमांक 13 "ब' मधून भाजपच्या वतीने निवडणूक लढविणारे मोहन गाडो यांच्यासह चौघांविरोधात उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एक वर्षापूर्वी झालेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्याने विरोधकांकडून गाडोंविरोधात प्रचार केला जाण्याची शक्यता आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 09:55 PM (IST)
|
मुंबई : मुंबईतील राजकीय पक्षांना गंगाजळी पुरविणारे कंत्राटदार सध्या भूमिगत झाले असून त्यांच्याकडून निवडणूक निधी वसूल करण्यासाठी विविध राजकीय पक्षांची खास "माणसे' त्यांचा शोध घेत आहेत मात्र हे कंत्राटदार नेत्यांच्या तावडीत सापडत नसल्याने निवडणुकीच्या प्रचाराबरोबरच त्यांच्या रागाचा पाराही चढू लागला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात या वेळी दोन ते तीन कोटी रुपयांचा चुराडा होणार आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 09:55 PM (IST)
|
मुंबई - महानिर्मितीची कामगिरी गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासूनच ढासळली आहे. वीजनिर्मिती घटल्यामुळे महावितरणला 800 ते 1000 मेगावॉट वीज खुल्या बाजारातून घ्यावी लागते त्याची झळ आता ग्राहकांना बसणार असून, वीजवापरासाठी दरमहा 100 ते 200 रुपयांचा भार सहन करावा लागणार आहे. महानिर्मितीकडून महापारेषणमार्फत महावितरणला वीज मिळते. कोळशाच्या तुटवड्याचा फटका देशातील सर्व वीजनिर्मिती कंपन्यांना बसला होता.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 09:55 PM (IST)
|
उल्हासनगर - उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्ष ताकदीनिशी उतरले असून, विजयाचा रथ खेचून आणण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचाराचे आकर्षक रथ तयार केले आहेत. प्रचाराला उल्हासनगरात जोमाने सुरुवात झाली असून, ठिकठिकाणी विविध पक्षांचे प्रचाररथ शहरात फिरताना दिसून येत आहेत. सध्या नेतेमंडळी त्यातून प्रचार करीत नसली तरी ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 09:40 PM (IST)
|
पनवेल - "कर्नाळा इन्फ्रो प्रोजेक्ट' या कंपनीमध्ये मी भागीदार असल्याचा आरोप वस्तुस्थितीला सोडून आहे. माझा या कंपनीशी काडीमात्रही संबंध नाही, असे आमदार विवेक पाटील यांनी स्पष्ट केले आहे. "कर्नाळा इन्फ्रो प्रोजेक्ट'ने उसर्ली येथे निकषाबाहेर जाऊन बांधकाम केल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडघर येथील जिल्हा परिषदत निवडणुकीतील प्रचार सभेत केला होता. त्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 09:25 PM (IST)
|
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत मतदारांना नकारात्मक मतदानाचा अधिकार गोपनीयपणे बजावता येणार नाही, असे आज राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. मुंबईबाहेर ज्या ठिकाणी दोन उमेदवारांसाठी मतदान होणार आहे, त्या मतदान यंत्रांमधील सुविधेमुळे मतदारांचे नकारात्मक मत गोपनीय राहू शकेल, असा दावा आज आयोगाने केला पण ठाम हमी मात्र दिली नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नकारात्मक मतदानाच्या गोपनीयतेला नकारच मिळाला आहे. ठाण्यातील नागरिक डॉ.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 09:25 PM (IST)
|
ठाणे - मुंबईसह ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचा हंगाम सुरू असल्याने बनावट नोटांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डुप्लिकेट नोटांपाठोपाठ निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या तळिरामांनाही बनावट मद्य दिले जात आहे आणि नॉन व्हेजवर ताव मारणाऱ्या खवय्यांनाही डुप्लिकेट मेजवान्यांची चंगळ उडवून दिली जात आहे. त्यामुळे निवडणुकीतही मतदार राजाला मामा बनवण्याचा फंडा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 09:25 PM (IST)
|
मुंबई - अनेक व्हीडीओ अल्बमच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडणारा बॉबी सिंह आता चित्रपटनिर्मितीमध्ये उतरला आहे. "सनम फिर मिलेंगे' या रोमॅंटिक चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच निर्मितीची बाजू त्यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या एका गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या शूटिंगला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बॉबीने 11 वर्ष ऍक्शन दिग्दर्शक वीरू देवगण यांच्यासोबत काम केले आहे.
|
|
|
|
|
Monday, February 06 AT 01:49 PM (IST)
|
वीजपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण केल्यामुळे गाड्यांचा वेग वाढणार अशी घोषणा होऊन २४ तास होण्याआधीच कोलमडलेले पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक हळूहळू सावरत आहे. सकाळी मरिनलाइन्स स्टेशनजवळ जलद मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेटकडे जाणा-या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 11:20 PM (IST)
|
मुंबई बंदरापासून ३५ सागरी मैल अंतरावर मच्छिमारी करणा-या नूर माढा या नौकेमध्ये अचानक पाणी शिरू लागल्याने ती बुडण्याचे संकट उभे राहिले असताना भारतीय कोस्ट गार्डच्या गस्तीनौकेने रविवारी पहाटे आपत्कालीन मदत पुरवून या नौकेस बुडण्यापासून वाचविले.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 11:20 PM (IST)
|
शहरातील रस्त्यांवर मुलांकडून भीक मागून घेण्याचा धंदा जोरात आहे. या धंद्यामागे असलेल्या टोळ्या मोडून काढण्यासाठी समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी माटुंगा ते अंधेरी सापळा लावला. पण धक्कादायक बाब म्हणजे या सापळ्यात मुलांना भीक मागायला लावणारे टोळीवाले न सापडता त्यांचे पालकच हाती लागले. या मुलांची रवानगी बाल भिक्षेकरी गृहात करण्यात आली आहे.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 11:20 PM (IST)
|
नांदेडमध्ये पाण्याच्या टंचाईमुळे गेले अनेकवर्ष टँकरने पाणी पुरवले जायचे आता मात्र ही परिस्थिती बदलली असून तेथील ब-याच गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मराठवाड्याच्या या जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या प्रयत्नांनांचे हे यश आहे.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 11:20 PM (IST)
|
मुंबईच्या लाइफलाइनचा एक भाग असलेली वेस्टर्न रेल्वे आता 'फास्टर' रेल्वे बनणार आहे. या मार्गावरील डीसीप्रणालीचे एसीप्रणालीत रुपांतर करण्याचा अंधेरी ते चर्चगेट दरम्यानचा शेवटचा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलाअसून सुमारे ८०० कामगार आणि अधिका-यांच्या टीमने हा 'जम्बो मेगाजॉब' नियोजित वेळेआधीच फत्ते केला.
|
|
|
|
|
Sunday, February 05 AT 09:40 PM (IST)
|
मुंबई - आयुर्वेदिक उपचार घेण्याबरोबरच विशिष्ट पथ्ये पाळली की मधुमेह, रक्तदाब, आर्थ्रायटिस यांसारख्या व्याधींवर पूर्णपणे नियंत्रण मिळविता येते. त्यामुळे सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाला पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी मुंबईत विलेपार्ले येथे केले. विलेपार्ले येथे पार्ले कट्ट्याच्या वतीने शनिवारी (ता. 4) डॉ.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|