Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

टू-जी स्पेक्‍ट्रम लिलावात युनिनॉरही भाग घेणार

eSakal
Monday, February 06, 2012 AT 07:55 PM (IST)
नवी दिल्ली - नॉर्वेतील टेलिनॉर आणि भारतातील युनिटेक या कंपन्यांची संयुक्त भागीदारी असलेल्या युनिनॉर या कंपनीने टू-जी स्पेक्‍ट्रम लिलावात भाग घेण्याचे जाहीर केले. मात्र, भारतातील बाजारपेठेतून बाहेर पडण्याचा पर्यायही कंपनीने अजून खुला ठेवला आहे. ""आम्ही लिलावात भाग घेण्याचे ठरवले आहे. मात्र, आम्ही सर्व गोष्टी जिंकूच असे नाही. त्यामुळे भारतातील व्यवसायातून बाहेर पडण्याचा पर्यायही फेटाळून लावता येणार नाही,'' असे युनिनॉरचे व्यवस्थापकीय संचालक आणि टेलिनॉरचे आशियाचे प्रमुख सिगवे ब्रेक यांनी पत्रकारांना सांगितले. स्पेक्‍ट्रमची किमान किंमत किती लावली जाते, त्याचा अंदाज घेऊन कंपनी पुढील धोरण ठरवेल, असे त्यांनी नमूद केले.