फिक्सिंग प्रकरणात अडकलेले पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान बटसह मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ यांना इंग्लंडविरुध्दच्या टी-२० मालिकेविरुध्द वगळण्यात आले आहे. या खेळाडूंना निलंबित करण्यात आलं नसून चौकशीच्या प्रक्रियेकरता त्यांची मुक्तता करण्यात आली आहे, अशी सारवासारव पाकचे मॅनेजर यावर सईद यांनी केली.