काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार पटकावणा-या राजीव तोमरसह, राष्ट्रकुल खेळांकरता भारतीय संघातील अन्य तीन खेळांडू डोपिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनातील नवनवीन प्रकरणं बाहेर येत असताना डोपिंग प्रकरणाने भारताच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. या चारही खेळाडूंना राष्ट्रकुलच्या संघातून निलंबित करण्यात आले आहे.