Updated:
Invite Friends

 
नेरुळमध्ये स्कूलबसने दोन मुलांना चिरडले
eSakal
Friday, September 03, 2010 AT 08:50 AM (IST)
मुंबई - नवी मुंबईतील नेरुळमध्ये रस्त्यावर खेळणाऱ्या दोन मुलांना स्कूलबसने चिरडल्याची घटना आज (शुक्रवार) दुपारी घडली. त्यातील एक मुलगा जागीच ठार झाला, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला. सेक्‍टर २३ मध्ये ही घटना घडली. स्कूलबसचालकाला अटक करण्यात आली आहे.