|
Tuesday, May 21 AT 03:05 PM (IST)
|
झुंजार, काळा पहाड, धनंजय हे मराठी ‘पल्प फिक्शन’मधले बाबुराव अर्नाळकरांनी निर्माण केले हीरो. आजही ते तुफान लोकप्रिय आहेत. काही प्रकाशकांनी आता अर्नाळकरांची पुस्तके नव्याने प्रकाशित केली आहेत. परंतु एकेकाळी ही पुस्तके अत्यंत स्वस्त कागदावर छापलेली असत आणि स्वस्तात मिळत. ‘झुंजार’चे नाव विजय. तो चर्चगेटजवळ उत्तुंग (म्हणजे पाच मजली) इमारतीत राहतो. मारामारीत,पिस्तुले चालवण्यात तो प्रवीण आहे तसेच कोणतेही कुलूप उघडण्यातही. तो आपली पत्नी विजयाबरोबर राहतो.
|
|
|
|
|
Tuesday, May 21 AT 03:00 PM (IST)
|
मागील आठवड्यात देशाच्या कायदामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. राजधानी दिल्लीच्या रंगमंचावर घडलेला तो एक नाट्यमय प्रसंग होता. त्या प्रसंगानेच कायदे बनवणार्या विभागाचा मंत्री कसे बेकायदा काम करू शकतो, हे वास्तव लोकांपुढे आणले. अश्विनीकुमारांचा एकूणच कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. दोन महिन्यांपूर्वीच देशाचे सॉलिसिटर जनरल रोहिंग्टन नरिमन यांनी कायदामंत्र्यांची कार्यपद्धती योग्य नसल्यामुळे त्या मोठ्या पदाचा राजीनामा दिला होता.
|
|
|
|
|
Monday, May 20 AT 05:37 PM (IST)
|
रिक्षा आणि रिक्षावालाकाका या दोन्ही गोष्टींशी शहरातील पालक आपल्या पाल्यांच्या निमित्ताने जोडले जातात. छोटा प्रवास करतानाही त्यांना रिक्षाची मदत घ्यावीच लागते. अलीकडच्या काळात रिक्षावालाकाकाविषयीच्या तक्रारींना प्रसिद्धीही मिळू लागली आहे. थोडक्यात रिक्षा हा रोजच्या रोज संबंध येणारा विषय आहे.
|
|
|
|
|
Monday, May 20 AT 05:27 PM (IST)
|
'लढता लढता केलेल्या चिंतनातील काही' हे पुस्तक विलास सोनवणे यांचे वैचारिक क्षेत्रातील सामाजिक समता व आíथक न्याय या मूल्यांचे समर्थन करणारे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे.   सामाजिक समता आणि आíथक न्यायाच्या विरोधातील विषमतेचे विविध कंगोरे सोनवणे यांनी स्पष्ट केले आहेत. या पुस्तकाचा आशय चळवळीमधून विकास पावला आहे. त्याच्या शीर्षकामधूनच या लेखकाचा चळवळीशी घनिष्ठ संबंध आहे, हे स्पष्ट होते आणि ती वस्तुस्थितीही आहे.
|
|
|
|
|
Monday, May 20 AT 04:23 PM (IST)
|
वि. स. खांडेकर तथा भाऊसाहेब हे मराठीतील   पहिलेवहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक-कादंबरीकार. त्यांचे एकंदर साहित्य आणि त्यासंबंधीची अनुकूल-प्रतिकूल अशी समीक्षा ही सहज उपलब्ध असली तरी चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कर्तबगारीच्या संदर्भात आजवर फुटकळ लेखनच काय ते हातात येते. ही उणीव 'अंतरीचा दिवा' या त्यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाने बरीचशी भरून काढली आहे. त्यामागे संपादक डॉ.
|
|
|
|
|
Monday, May 20 AT 03:37 PM (IST)
|
'अन्नभेसळ' हा शब्द सर्वांच्याच परिचयाचा आहे. अन्नभेसळ शोधणं म्हणजेच अन्नपदार्थांची गुणवत्ता पाहणं. भेसळयुक्त अन्नास "असुरक्षित अन्न' असं संबोधण्यात आलं आहे. पूर्वीच्या अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याच्या जागी आता नवीन अन्नसुरक्षा व प्रमाणके हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. या कायद्यानुसार असुरक्षित अन्न, गैर नामकरण केलेला अन्नपदार्थ, खासगी मालकीचा अन्नपदार्थ, अन्नपदार्थात समाविष्ट न होणारे पदार्थ, वगैरेंच्या व्याख्या दिल्या आहेत. डॉ. पी. जी.
|
|
|
|
|
Monday, May 20 AT 03:29 PM (IST)
|
कलाकाराची ओळख त्याच्या कलाविष्कारातून समर्थपणे होत असली, तरी तो कलाकार "व्यक्ती' म्हणून कसा आहे, याचं कुतूहल अनेकांना असतं. खरं तर प्रसिद्धीच्या झोतातल्या सगळ्यांबद्दल लोकांना- विशेषतः त्या व्यक्तींच्या चाहत्यांना असं औत्सुक्य असतं. अशा व्यक्तींपर्यंत पोचणं आणि प्रत्यक्ष ओळख करून घेणं सर्वसामान्यांना शक्य होत नाही. मग त्यांच्यापुढे एकच मार्ग असतो. तो म्हणजे, त्या व्यक्तीच्या संपर्कातल्या कोणी तरी सांगितलेल्या आठवणी वाचणं किंवा ऐकणं.
|
|
|
|
|
Saturday, May 18 AT 11:28 AM (IST)
|
मुलांच्या भल्याचा, उज्ज्वल भविष्याचा तिन्ही त्रिकाळ विचार करणाऱ्या पालकांनी या मुलांच्या बाबतीत काही विपरीत घडले तर काय, या शक्यतेची कल्पनाही केलेली नसते. पण तसे काही झालेच तर अशा संकटांना सामोरे जायचे बळ एकवटणे हाही पालकत्वाचा अविभाज्य भागच असतो. शेरील कोएनिग या ऑस्ट्रेलियन महिलेचे 'पेपर क्रेन्स' हे आत्मकथन अशाच एका आईच्या जिद्दीची गोष्ट आहे.
|
|
|
|
|
Wednesday, May 15 AT 02:08 PM (IST)
|
17 सप्टेंबर 2011 रोजी अमेरिकेतील हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले. ‘वॉल स्ट्रीटवर कब्जा करा’ ही घोषणा करत ठाण मांडून बसले. बघता बघता ही घोषणा शंभर देशांमधल्या 1500 शहरांमध्ये पसरली. ही निदर्शने सर्वसामान्य लोकांची आहेत. भारतातही भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला असाच अनपेक्षित, अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
|
|
|
|
|
Wednesday, May 15 AT 01:37 PM (IST)
|
ज्याला स्वतःचेच ढोल चांगले वाजवता येतात तो राजकारणात टिकू शकतो. ज्याच्याकडे या गुणाबरोबरच दुसऱ्याला धक्क्याला लावण्याची क्षमता असते तो पक्का राजकारणी असतो आणि ज्याच्याकडे सत्य सोयीने आणि सोयिस्कर पद्धतीने सांगण्याचा अतिरिक्त गुण असतो तो नेतेपदाच्या पाय-या चढतो. भारतीय राजकारणातले हे वास्तव ममता बॅनर्जींचे 'माँ.. माटी... मानुष' वाचताना प्रकर्षाने जाणवते.
|
|
|
|
|
Tuesday, May 14 AT 04:36 PM (IST)
|
भविष्याच्या पोटात काय दडले आहे, हे जाणण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. पारंपरिक ज्योतिष आणि कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दतीत हातावरुन किंवा चेह-यावरून भविष्य सांगतात. या पध्दतीबरोबरच भविष्य कथनासाठी संख्याशास्त्राचाही वापर होतो. जन्मतारखेवरून एखाद्या व्यक्तीचे भविष्य, आरोग्य, होणारे आजार, आदीबाबतची महत्वाची माहिती यातून समजून घेता येते. तसेच दैनंदिन जीवनातील प्रश्नांबाबतही या पध्दतीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते.
|
|
|
|
|
Tuesday, May 14 AT 04:27 PM (IST)
|
मराठीत चित्रकलेवर फारसं साहित्य उपलब्ध नाही, असं नेहमीच म्हटलं जातं आणि ती बाब काही प्रमाणात खरीही आहे. पण गेल्या दोन- तीन वर्षांत ही परिस्थिती बदलत आहे. भरपूर संदर्भ - साहित्य, कोश प्रसिद्ध होत आहेत. या बदलाची सुरुवात २००९ साली प्रकाशित झालेल्या 'मराठी नियतकालिकांतील दृश्यकलाविचार' या रमेशचंद्र पाटकर यांनी लिहिलेल्या व 'ज्योत्स्ना प्रकाशन' ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाने झाली, असं म्हणायला हरकत नाही.
|
|
|
|
|
Tuesday, May 14 AT 04:10 PM (IST)
|
चित्रकार नितीन दादरावाला यांचे 'प्रतिमा-प्रचीती' हे आगळेवेगळे पुस्तक नुकतेच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रसिद्ध झाले आहे. यात त्यांनी जगभरात गाजलेल्या पंचवीस नामांकित छायाचित्रकारांची सविस्तर ओळख करून दिली आहे. सोबत त्यांची उत्कृष्टे छायाचित्रेही आहेत. या पुस्तकाला समीक्षक-कवी वसंत आबाजी डहाके यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही संपादित अंश..
|
|
|
|
|
Tuesday, May 14 AT 03:14 PM (IST)
|
निसर्ग आणि पर्यावरण यांच्यासाठी आयुष्यभर झटलेल्या जॉन म्यूर या अमेरिकन निसर्गमित्राची ही छोटीशी जीवनकथा आहे. 'अमेरिकेतील अभयारण्यांचा जनक' अशी पदवी म्यूर यांना देण्यात आली, त्यांच्यामुळेच अमेरिकेत 'नॅशनल पार्क्स'ची निर्मिती झाली, त्यांच्याच प्रेरणेनं 'सिएरा क्लब' या पर्यावरणविषयक संस्थेची स्थापना झाली, अनेक निसर्गस्थळांना त्यांचं नाव देण्यात आलं. अमेरिकेतील वनसंपदा नष्ट होऊ नये म्हणून म्यूर यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
|
|
|
|
|
Tuesday, May 14 AT 02:29 PM (IST)
|
ख्रिस्ती धर्माच्या आगमनामुळे महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात निर्माण झालेले बहुपेडी ताणतणाव आणि विविधांगी बदल यांविषयी वेळोवेळी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या नरेंद्र चपळगावकरांच्या एकूण नऊ लेखांचा हा संग्रह आहे. धर्म, समाज, साहित्य, संस्कृती, राजकारण, इतिहास, न्यायव्यवस्था आदींबद्दल गंभीर असोशी असणाऱ्या सर्वासाठी महत्त्वाचा नि मौलिक ऐवज ठरावा इतका हा संग्रह गुणाढय़ आहे.
|
|
|
|
|
Tuesday, May 14 AT 02:19 PM (IST)
|
आनंद विनायक जातेगांवकर यांची सत्तरीच्या दशकातील महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळख आहे. लक्षणीय व वेगळ्या संवेदनेची कथा त्यांनी लिहिली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबजीवनाचे त्यांनी घडविलेले दर्शन अतिशय वेगळे होते. तसेच किशोरवयीन मुले व स्त्रियांचे भावविश्व त्यांच्या कथांमधून फार भेदकपणाने आलेले आहे. अलीकडेच त्यांची 'अस्वस्थ वर्तमान' ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.  कादंबरी आणि वैचारिक गद्याच्या सीमा पुसट करणारी ही कादंबरी आहे.
|
|
|
|
|
Tuesday, May 14 AT 02:05 PM (IST)
|
कोणत्याही वृत्तपत्रीय लिखाणाला वर्तमानाचा संदर्भ असतोच, असावाच लागतो पण त्यामुळं होतं काय, की काही काळानंतर वर्तमानपत्राबरोबर जुन्या लेखांची-सदरांचीही रद्दी होते. फार कमी लेख असे, की ज्यांचे संदर्भ सार्वकालिक असतात. अशा लेखांची-सदरांची "सद्दी' कधीच संपत नाही. त्यांचे संग्रह, पुस्तकं होतातच. प्रसाद कुलकर्णींचं "प्रासादिक' तसंच आहे.  प्रसाद कुलकर्णी यांनी सकाळ (मुंबई) आणि इतर काही नियतकालिकांत लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह.
|
|
|
|
|
Saturday, May 11 AT 05:18 PM (IST)
|
मोठ्या समूहाने आपण भ्रमंतीला चाललो असू तर त्यात उशिरा सहभागी झालेला दमछाक झाल्यामुळे मागे पडत गेला' तर त्याला कायम मागेच राहावे लागते. पुढचा समूह विश्रांतीसाठी अधेमधे थांबला तरी या मागे राहिलेल्यांना विश्रांती मिळत नाही. बोरं-करवंदांची मजा पुढच्यांना मिळते' यांच्या वाट्याला मात्र पाणीही जेमतेमच येते. पर्यावरण आणि साधनस्रोतांच्या बाबतीत तिसऱ्या जगातील विकसनशील राष्ट्रांचे असेच काहीसे झाले आहे.
|
|
|
|
|
Wednesday, May 08 AT 05:57 PM (IST)
|
मराठीचे मूर्धन्य कवी फ. मुं. शिंदे यांचा पहिला कवितासंग्रह 1972 मध्ये प्रसिद्ध झाला होता. नुकताच त्यांचा पंचविसावा कवितासंग्रह "निर्वासित नक्षत्र' हाती आला आहे. म्हणजे कवितांचा सुवर्णमहोत्सव आणि कवितासंग्रहांचा रौप्यमहोत्सव! फ.मुं.च्या कवितासंग्रहांत खंड पडला असेल, पण लेखनात कधीही नाही. कविता या एकाच वाङ्मय प्रकारावर अव्यभिचारी निष्ठा ठेवून साधना करणारे अन्य उदाहरण विरळाच. फ.मुं.चा चोविसावा संग्रह सहा वर्षांपूर्वी आला होता.
|
|
|
|
|
Wednesday, May 08 AT 03:53 PM (IST)
|
'जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ' असे म्हणत गेल्या दशकभराहून अधिक काळ तरुणाईला साद घालत मराठी आणि त्यातही कवितांपासून दूर गेलेल्या या पिढीला पुन्हा कवितेकडे वळायला लावले ते संदीप खरे या कवीने. दोस्त, तरुणाई याबरोबरच या गुलाबी दिवसातील हळुवार प्रेमभावना आणि त्याचे कंगोरे, भावबंध त्याने सहज सोप्या शब्दांद्वारे आपल्या कवितेतून मांडले. त्यामुळेच त्याच्या कवितांना तितकीच रसिक दाद, प्रेम मिळाले.
|
|
|
|
|
Monday, May 06 AT 08:19 PM (IST)
|
'प्रेम, स्पर्श आणि आकर्षण' या पुस्तकाचे उपशीर्षक आहे- 'स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध.' स्त्री-पुरुष आकर्षण हा तसा सनातन विषय. त्याविषयी सतत लिहिलं जातं, बरंच काही बोललं जातं. परंतु त्याला शास्त्रीय आधार बऱ्याचदा कमी असतो. निरंजन घाटे हे विज्ञानलेखक असल्याने त्यांना शास्त्रीय पातळीवर याविषयी काय काय संशोधन झालेलं आहे, होत आहे याची योग्य ती माहिती आहे.
|
|
|
|
|
Monday, May 06 AT 08:11 PM (IST)
|
महाराष्ट्रात २००२ सालापासून माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. तेव्हापासून या कायद्याविषयी सतत काही ना काही चर्चा सुरूच असते. या कायद्याच्या अंमलबजावणीतील अडीअडचणी, त्याच्यामुळे अडचणीत येणाऱ्या संस्था, प्रशासकीय अधिकारी, शासन, नेते यांविषयी अधूनमधून माहिती उजेडात येतच असते. पण हा कायदा नेमका काय आहे, तो कसा वापरावा, कुठल्या गोष्टींबाबत तो परिणामकारक आहे व कुठल्या बाबतीत नाही, याची जनसामान्यांना फारशी माहिती नसते.
|
|
|
|
|
Monday, May 06 AT 08:06 PM (IST)
|
हे सुरुवातीलाच ध्यानात घ्यायला हवं की, तीनशेहून अधिक पानांचं हे पुस्तक चार्ल्स डिकन्स या ब्रिटिश कादंबरीकाराबद्दल असलं तरी ते त्याचं चरित्र नाही. पण ही डिकन्सविषयीची चरित्रात्मक कादंबरीही नाही. तर हे डिकन्सविषयीचं पुस्तक आहे. गत वर्षी डिकन्सची द्विजन्मशताब्दी साजरी झाली, तर नुकतीच 'पिकविक पेपर्स' या त्याच्या गाजलेल्या कादंबरीला पावणेदोनशे र्वष झाली आहेत.
|
|
|
|
|
Monday, May 06 AT 04:40 PM (IST)
|
गेल्या चार-पाच दशकांहून अधिक काळ लेखन करणाऱ्या डॉ. अनिल अवचट यांचा 'रिपोर्टिगचे दिवस' हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. १९७० ते ७५ या कालखंडादरम्यान अवचटांनी 'साप्ताहिक मनोहर', 'साधना'मध्ये लिहिलेले महत्त्वपूर्ण लेख या संग्रहात एकत्रित करण्यात आले आहेत. विविध घटनांचे संदर्भमूल्य असणारे हे लेख त्यातील जिवंत व ताज्या भाषाशैलीमुळे व तत्कालीन परिस्थितीचा अन्वयार्थ लावू पाहणाऱ्या जीवनदृष्टीमुळे आजच्या काळातही महत्त्वाचे ठरतात.
|
|
|
|
|
Monday, May 06 AT 04:33 PM (IST)
|
आज मानव हा पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ प्राणी मानला जातो. खरे तर मानवापेक्षा शक्तिशाली अनेक प्राणी पृथ्वीतलावर आहेत. परंतु आपल्या बुद्धिसामर्थ्यांच्या बळावर मानवाने या साऱ्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानव आपले जीवन अधिकाधिक सोपे आणि समृद्ध करतो आहे. त्याला आपल्या जीवनाचा विशेष अभिमान वाटतो. त्यामुळे इतर प्राणी व जीवजंतूंचे जीवन त्याला क्षुल्लक वाटते.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|