Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 
 


विनोद,मराठी विनोद,मराठी जोक्स,पहिले पाऊल,Jokes   Read More....
By : Global Marathi     Posted On : 23 Apr 2010     Visits : 17265
कालचीच गोष्ट. मी बरेच दिवसांनी TV बघायला बसलो.माझी सौ नेहमी प्रमाणे स्वयंपाक घरात व्यस्त (त्रस्त ?) होती.काही वेळाने ती पण TV बघायला बाहेर आली व मला म्हणाली," TV वर काय आहे ?""धूळ !" माझॆ प्रामाणीक ,उत्तर आणि दिवसभर भांडण पुरले !!!   Read More....
By : Global Marathi     Posted On : 23 Apr 2010     Visits : 18025
धनंजय : अरे संजय आज मी घटस्फोटाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.संजय : का ? कोणी चांगला वकिल भेटला का ?धनंजय : नाही, आज माझे लग्न ठरले.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 23 Apr 2010     Visits : 16596
प्राध्यापक वर्गात: मुलांनो तुम्हाला फार अभ्यास करायचा आहे. आता परिक्षा जवळ य़ेत आहेत. पण तुम्ही रोज कमितकमी ७ तास झोप घेतलीच पाहिजे.बाळू: सर हे कसं शक्य आहे ? कॉलेज तर फक्त सहाच तास असते नां ?   Read More....
By : Global Marathi     Posted On : 22 Apr 2010     Visits : 18794
रिक्षावाला मिटरकडे बघुन : साहेब १०० रुपये झालेत.सांता : हे घे ५० रुपये.रिक्षावाला : साहेब हे बरोबर नाही. १०० रुपये झाले असतांना तुम्ही मला ५० रुपयेच देत आहात.सांता : अरे तु पण माझ्या सोबत रिक्षात बसुन आलास नां ?   Read More....
By : Global Marathi     Posted On : 22 Apr 2010     Visits : 16383
पराग आपल्या मित्राला सांगत होता," अरे, मी ज्या-ज्या मुलीला लग्नासाठी पसंत करतो ती मुलगी आईला आवडत नाही. काय करू कळत नाही."मित्र : तु तुझ्यासाठी तुझ्या आईसारखीच एखादी मुलगी बघ. ती तुझ्या आईला आवडेल.पराग काही दिवसांनी : अरे मी अगदी आईसारखीच मुलगी शोधली पण बाबा माझा व तिचापण राग करायला लागलॆ.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 22 Apr 2010     Visits : 14766
शेतकरी : वकिलसाहेब, कोणाची म्हैस माझ्या शेतात शिरली व तिने शेतातले पिक खाल्ले तर मी काय करावं ?वकिल : तुम्ही त्या म्हशीच्या मालकाला झालेली नुकसान भरपाई मागु शकता.शेतकरी : द्या तर मला ४०० रुपये. काल राती तुमचीच म्हैस माझ्या शेतात शिरली होती.वकिल : खर तर तुम्हीच मला १०० रुपये देणे लागता. ५०० रुपये माझा सल्ला घेतल्याचे. त्यातुन तुमचे नुकसान झाल्याचे ४०० रुपये वजा करा व माझे १०० रुपये आणा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 22 Apr 2010     Visits : 10994
नन्या : अरे बन्या माझा बॉस रोज रोज मला त्याच्या घरापर्यंत माझ्या स्कूटरवर लिफ्ट मागतो रे. मला कंटाळा आला आहे याचा. काय करु सांगना.बन्या : तो गाडीवर बसुन काही बोलतो का ?नन्या : हो , माझ्या चालवण्याच कौतुक करत असतो.बन्या : त्याने कौतुक केल्यावर त्याला सांग तु रस्ता पार करताना काय करतोस. तो परत लिफ्ट मागणार नाही.नन्या : काय सांगु ?बन्या : त्याला सांग रस्ता पार करतांना तु डोळे बंद केलेले असतात व लोकांनी ते बघितले असते म्हणुन अपघात होत नाही. यात तुझे कौशल्य नाही.....काही दिवसांनी.नन्या : अरे बन्या तुझा मंत्र काम   Read More....
By : Global Marathi     Posted On : 22 Apr 2010     Visits : 11434
शिक्षीका : मुलांनो, कोणी एखाद्या कागदाकडे बघुन भविष्य सांगू शकते कां ?बाळू : हो.शिक्षीका : कोण ?बाळू : माझी आई.कस काय ?बाळू : माझ्या गुणपत्रिकेकडॆ बघुन आई सांगू शकते बाबा घरी आल्यावर काय होणार.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 22 Apr 2010     Visits : 16476
अरे तुला रडायला काय झालं ?तो हत्ती आज मेला.तर काय तो हत्ती तु पाळलेला होता कां ?नाही, त्याला पुरायला खड्डा खणायला मला सांगण्यात आलय.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 15634
सांता डॉक्टरला : डॉक्टर सर्व अंगावर दुखते आहे.डॉक्टर : कुठे दुखते आहे ?सांता : (सांता एका बोटाने दाखवतो) हे बघा, डाव्या पायाला हात लावला तर दुखते.डॉक्टर : आणि ?सांता : हे बघा, उजव्या पायाला हात लावला तरिही दुखते.डॉक्टर : आणि ?सांता : कानाला हात लावला तरिही दुखते.डॉक्टर : आणि ?सांता : कपाळाला हात लावला तरिही दुखते.डॉक्टर : तुम्हाला काही झालेले नाही, तुमचे बोट दुखावलेले आहे.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 5183
.एकदा एका खिसेकापूला कोर्टात हजर करण्यात आले.न्यायाधीशांनी त्याला सहा महिने जेल किंवा दोन हजार रुपये दंड ठोठावला. तेंव्हा खिसेकापू चोराचा वकिल म्हणाला, "साहेब, माझ्या अशिलाला दंड भरायचा आहे, पण त्याच्याकडे फक्त एक हजार रुपयेच आहेत. तुमची परवानगी असेल तर तो या गर्दीत दहा मिनीटे फिरुन अजुन एक हजार रुपये आणु शकेल."   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 7929
१०० रुपयात ५०००० चे फटाक्याचा आनंद घ्या ! हि योजना सर्वांसाठी खुली आहे.कृती:१. बाजारात जा.२. फटाक्यांच दुकान शोधा.३. तेथून मोठा आवाज करणारे १०० रुपयांचे फटाके घ्या.४. संध्याकाळी घरातील सर्वांनी मिळून विकत आणलेले फटाके. उडवा.५. फटाके फोडताना होणारा आवाज रेकॉर्ड करा.६. आपल्या CD प्लेयरवर तो आवाज मोठ्याने वाजवा.७. ५०००० रुपयांच्या फटाक्याचा आवाजाचा आनंद लूटा.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 8401
.डॉक्टर ऑपरेशन टेबलवरच्या रुग्णाला : " तुम्हाला घाबरायला काय झालं ? घाबरु नका. काही होणार नाही."रुग्ण : डॉक्टर माझं हे पहिलच ऑपरेशन आहे.डॉक्टर : बघा माझही हे पहिलच ऑपरेशन आहे तरिही मी घाबरलेलो नाही.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 8810
एकदा एका मनोरुग्णालयात डॉक्टर आठ रुग्णांची परिक्षा घेणार होते. ज्यामुळे त्यांना तेथुन सुटका होणार होती.डॉक्टरांनी त्या खोलीच्या एका भिंतीवर खडूने दरवाजा काढला व त्या आठ जणांना सांगितले ते दार उघडा व खोलीच्या बाहेर पडा.सात जणांनी उठुन त्या दाराने बाहेर जायचा खुप प्रयत्न केला पण एक जण आपल्या जागेवरच बसुन राहिला.डॉक्टरांनी त्याला न उठण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, " मी त्या दाराच्या कुलूपाची किल्ली घेउन बसलो आहे."   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 5768
आजीबाई खेड्यातुन शहरात आपल्या नातवाकडे आल्या आहेत.एक दिवस आजीबाई तक्रार करतात की त्यांचा दात दुखत आहे. म्हणुन नातू त्यांना दातांच्या डॉक्टरकडे घेउन जातो.डॉक्टर : आजी तोंड उघडा.आजीबाई थोडस तोंड उघडतात.डॉक्टर : आजी अजुन तोंड उघडा.आजीबाई अजुन थोडस उघडतात.डॉक्टर : आजी अजुन तोंड उघडा.आजीबाई वैतागुन : कारे मेल्या अजुन किती तोंड उघडू. दात काढायला काय तोंडात जाउन बसणार आहेस काय ?   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 4046
डॉक्टर सांताने फार गंभीर चेहरा करुन हातात टॉर्च घेऊन पेशंटचे डोळे तपासले, जिभ बघितली, कान तपासले आणी.........बराच विचार करुन म्हणाला..........टॉर्च चांगला आहे !!!   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 7478
.साहेब माझी बायको गेले सहा महिने माझ्याशी बोलतच नाहीये. मला तिच्यापासुन घटस्फोट मिळवून द्या. मी तुम्हाला हवे तितके पैसे द्यायला तयार आहे.वकिल: काय तुम्ही नशिबवान, अहो अशी बायको मिळत नाही. घटस्फोट घेऊ नका.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 6899
बायको : अहो, मला आज पहाटे स्वप्नात दिसल, तुम्ही साडी घ्यायला मला ५००० रुपये दिलेत. पहाटेच स्वप्न खर होणार कां ?नवरा : होणार ना. ठेव ते ५००० रुपये तुच आणि आण त्याची साडी.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 10461
.हवालदार दारुड्याला : अरे ए कुठे चाललास असा रात्रीचा ?दारुडा : मी भाषणाला चाललोय.हवालदार : भाषणाला ? कुठे ?दारुडा : दारुचे वाईट परिणाम या विषयावर भाषण ऎकायला.हवालदार : तुला रात्री बारा वाजता कोण भाषण ऎकवणार ?दारूडा : मी घरी पोचल्यावर माझी बायको.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 9893
मि. देसाई तुम्हाला नोकरिवरुन काढलं जातय. बॉस देसाईला म्हणाला.पण सर. -देसाईबॉस : पण काय ?.देसाई : पण सर, मी काहिही केल नाही.बॉस : होय खरयं. तुम्हाला काम करण्यासाठी कामावर ठेवलय. त्यामुळे, काहिही काम न करण्यामुळे तुम्हाला कामावरुन काढण्यात आलय !   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 5560
त्याने कंटाळून, अतिशय रागाने आपल्या बायकोला मगरींच्या तलावात फेकले.....आणि....पशु मित्रांनी त्याच्यावर मगरिंचा छळ केल्याचा खटला लावला.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 6394
एकदा एक पोपट उडत जात असतांना एक ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध पडतो.त्या ट्रक ड्रायव्हरला त्याची दया येते.तो त्या पोपटाला पकडतो, फार काळजीपूर्वक घरी आणतो व एका पिंजर्यात ठेवतो.ट्रक ड्रायव्हरच्या उपचारांनी पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्यात बघून तो घाबरतो व जोरात ओरडतो," अरे बापरे जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय."   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 8629
न्यायाधिश: सांता तर तुला घटस्फोट हवाय ?सांता : होय साहेब.न्यायाधिश : तुझ्यामते घटस्फोटाचे मुख्य कारण काय आहे ?सांता : साहेब, लग्न.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 8607
.एकदा एका शाळेतल्या व्रात्य मुलांनी शाळेत काहीतरी मस्ती करायची ठरवले.बर्याच विचारांती त्यांनी तीन गाढव आणले व त्यांच्या पाठीवर १, २ व ४ हे क्रमांक घातले व त्यांना शाळेच्या मैदानात सोडून दिले.मुख्याधापकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी शाळेतले सर्व कर्मचारी गाढव क्रमांक ३ शोधायला दिवसभर राबवले.   Read More....
By : Global Marathi     Posted On : 21 Apr 2010     Visits : 12990
1 2
Top
Featured Bloggers