Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 

पिवळारंग

 
By : Ramchandra Rane      On: September 13, 2017
463 Visits   
Report Abuse
http://ramukaka.globalmarathi.com
Search by Tags:  कविता

नेसुनी पिवळी साडी नवीकोरी
देवि दुर्गा बसली सिंहासनी
आली देवी नटुनि थटूनि
भक्त जाईल आशिर्वाद घेऊनी
बाप्पा ओ आपला लंबोदर
आवड त्याची पिवळा पितांबर
म्हणा एळ कोट एळ कोट जय मल्हार
उडवा फक्त हळदीचा भंडारा
सण दसरा असो वा दिवाळी
दारात तोरण असते झेंडूचे पिवळे
पदार्थ हि असतील सोन्याहुनपिवळे
श्रीखंड, मोतीचूर, लाडू ,जिलेबी, कानवले ,
उत्सव ?मग असणारच पिवळा पोशाख
असणारच सदरा लेंगा पिवळा धम्मक
प्रसिध्द व्यक्तिमत्वे वापरतात पिवळे
याशिवाय नसावे कोणते सोवळे ?
स्वभाव बनतोच त्यांचा वेगळा
खोडकर हसरा अन खेळकर
उगम पिवळ्याचा सूर्यापासून
भडक स्वभाव तेव्हापासून
जगात लक्षवेधी ठरला
कार्टून जगतात अव्वल ठरला
जेव्हा जगात सर्वेक्षण झाले
कर्तुत्वाने महान तू झाला
चल मी तुला सलाम केला !

Search by Tags:  कविता
 Name :
* Comment : Type in  
0/500
Top