Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 

चि. मानसीस ( दीड वर्षाच्या नातीस )

 
By : bhagwan nagapurkar      On: September 10, 2017
268 Visits   
Report Abuse
http://b.k.nagapurkar.globalmarathi.com
Search by Tags:  इंद्रधनु

चि. मानसीस

( दीड वर्षाच्या नातीस )

थांबव मानसी, चक्र वाढीचे,

कळ्यातूनी तू फुलतांना,

हासत खेळत तुरु तुरु चालणे,

शिशू म्हणूनी जगतांना ।।१।।

कौतुकाने ऐकतो तुज,

शब्द बोबडे बोलतांना,

हरखूनी जातो चाल बघूनी,

हलके पाऊल पडतांना ।।२।।

आनंद पसरे सभोवताली,

इवल्या त्या प्रयत्नांनी,

बदलूनी जाईल क्षणात सारे,

रुळलेल्या तव हालचालींनी ।।३।।

तुझ्यासाठी जे नवीन होते,

प्रयत्न तुझा शिकून घेणे,

अपूर्णतेची आमुची गोडी,

लोप पावेल पूर्णत्वाने ।।४।।

डॉ.भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com


Search by Tags:  इंद्रधनु
 Name :
* Comment : Type in  
0/500
Top