Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 
जव्हारचे अॅड. राजाराम मुकणे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीच्या सेक्रेटरी पदी नियुक्त

 
By : Pravin Mukane      On: September 03, 2012
5084 Visits   
Report Abuse
http://hivision.globalmarathi.com
Search by Tags:  Rajaram Mukane


प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकररावपिचड यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यकारणीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली.यामध्ये जव्हारचे अॅड. राजाराम मुकणे यांची पक्षाचे प्रदेश सेक्रेटरी म्हणूननियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

जव्हार नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष व ठाणेजिल्हा बँकेचे माजी संचालक अॅड. राजाराम मुकणेयांनी आतापर्यंत केलेले निस्वार्थी कार्यव त्यांच्याकडे असलेले संगठन कौशल्य यामुळेच प्रदेश निवडणूक अधिकारी मदन बाफना यांच्याहस्ते मुंबई येथील प्रदेश कार्यालयात अॅड. राजाराम मुकणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी ग्रामीण तालुक्यांतील आणि इतर सर्व जनतेच्याउन्नतीकडे शासनाने गभीर होऊन अधिक लक्ष घालावे यासाठी त्यांची सतत धडपड असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्यास्थापनेनंतर ते जव्हार तालुक्याचे पहिले अध्यक्ष होते. तसेच त्यानंतर काही वर्ष त्यांनीराष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पद देखील यशस्वीरित्या भूषवले त्यामुळेच आगामी २१४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवरराष्ट्रवादी कॉँग्रेसने ठाणे जिल्ह्यातीलग्रामीण आदिवासी भागातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अॅड. मुकणे यांची प्रदेश राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सेक्रेटरी पदी नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्व थरांतून स्वागत झाले आहे.


Search by Tags:  Rajaram Mukane
 Name :
* Comment : Type in  
0/500
Top