Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 

निबंध पावसाचा

 
By : mayuresh bhosale      On: June 12, 2010
22583 Visits   
Report Abuse
http://mayuresh88.globalmarathi.com
Search by Tags:  Forwarded Mails

सहावी ड च्या राम गणपुलेचा निबंध

निबंद - पावूस !

पावूस हा माजा आतिशयच आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भात व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. ' रिमजिम पडती श्रावण गारा ' हे गाणे आतिशय रोमहर्षक आहे. आमचा रेडियो बिघडला आहे त्यामुळे नीट ऐकू नाही आले तरीही आतिशयच आवडले.

पाउसाची सुरुवात रोमहर्षक असते. आधी कडाक्याचा उन्हाळा पडतो. पेपरमधल्या वृत्तपत्रात बातम्या येउ लागतात. ' उन्हाळा कमी होता की काय म्हणून आता पावसाने मारलेली आहे ' अशी नेमी बातमी असते (दडी हे लिहायचे राहिले ते कंसात लिहिले आहे )

भारतात पाउस अंदमान येथे बनतो. तो वळत वळत केरळ गावात आणि तिथून वळत वळत पुणे शहरात येतो. म्हणूनच त्याला वळीव म्हणतात किंवा काहीजण वळवाचा पाउस ही म्हणतात. (आम्ही समोरच्या गोगटे काकाना त्यांच्यासमोर 'काका ' आणि इतर काळी 'तात्या विनचू ' म्हणतो तसेच दोन सन्मानार्थी शबद आहेत ते.)

काल पुण्याच्या शहरात पाउस पडला. पुणे हे प्राचीन व प्रेकशणीय शहर आहे. तिथे शिंदे छत्री , शनिवारवाडा, सिटी प्राईड, पर्वती, काकडे मॉल अशी पर्यटन स्थळे आहेत. ह्यातल्या काही ठिकाणी घरचे लोक मला रविवारी पर्यटनाला नेतात.

काल पावसाबरोबर गाराही पडल्या. गोगटे काकानी त्या जमवून माठात टाकल्या. ते कुठहिलि फुकट गोशट वाया घालवत नाहीत.

अंत्या आतिशय बावळट आहे. तो बाबांचे हेलमेट घालून गारा वेचायला आला होता. मग मीही छतरी घेऊन गेलो. छतरी उलटी करुन गारा वेचल्याने ती फाटली.

असा हा रोमहर्शक रुतु मला आतिशयच आवडतो.