Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 

निळारंग

 
By : Ramchandra Rane      On: September 13, 2017
655 Visits   
Report Abuse
http://ramukaka.globalmarathi.com
Search by Tags:  कविता
हलाहल पचवून झाला नीलकंठ
नीळवर्ण घेवून अवतरला श्रीकृष्ण
ऐश्या निळ्याची हि महती
पसरे आकाशभर आकाशात
उसळे सागरभर सागरात
निळ्याची निळाई बर !
थंड शांत सुखद देई अनुभव
सांगतो जागा असेच जीवन
विश्वास ,भरोश्याची देतो शिकवण
जगरहाटीत यशस्वी करतो पण !
ठेवा तोंडात साखर डोक्यावर बर्फ
राहा सदा व्यवहारात गर्क
कामवा घ्या जमीन जुमला पैसा अडका
खेळ मौज मजा करा मनोरंजन
साजरे करा सणसोहळे समारंभ
साडेसाती लागली असता व पनवती
निलरत्नाने गायब होती
होतेच कृपा शनिदेवाची
उपकाराची नसते अपेक्षा
प्रवाहाविरुद्ध पोहण्याची होते इच्छा
खासियत निळ्यारंगाची हीच ती कृपा
जन्मापासून मृत्युपर्यंत
निळ्या शाईची असते साथ
घडविले आतापर्यंत महापुरुष
घडतील बहु भविष्यातही
मी झालोय गुलाम
निळ्या रंगा तुला निळा सलाम

Search by Tags:  कविता
 Name :
* Comment : Type in  
0/500
Top