Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 
पाककृती - गाजराची कोशिंबीर

 
साहित्य :
१) दोन कप गाजराचा कीस
२) एक टीस्पून लिंबू रस
३) सव्वा टीस्पून साखर
४) दोन टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
५) मीठ चवीप्रमाणे
६) दही आवडत असल्यास
७) एक टेबलस्पून तेल,
८) पाव टीस्पून मोहरी ,
९) पाव टीस्पून हिंग ,
१०) पाच-सहा कढीपत्ता पाने,
११) एक हिरवी मिरची

कृती :-

गाजराच्या किसाला मीठ ,साखर लावून घेऊन लिंबाचा रस घालून एकत्र करावे.

फोडणीच्या कढईत तेल तापवून आधी मोहरी घालावी. मोहरी तडतडली कि हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घाला. शेवटी हिंग घालून कोशिंबीरीला फोडणी द्या.

टीप : फोडणी दिल्यावर लगेच कोशिंबीर झाकून ठेवा म्हणजे कोशिंबीरीला फोडणीचा छान स्वाद येतो.
आवडत असल्यास दही मिक्स करून देखील ही कोशिंबीर छान लागते.

 Name :
* Comment : Type in  
0/500
Top