Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 

फोटो लावण्याची गरज नाही - डॉ. सुधीर रा. देवरे

 
By : Dr. Sudhir Deore      On: March 09, 2013
1846 Visits   
Report Abuse
http://sudhirdeore29.globalmarathi.com


माझ्याकडेअभ्यास, मार्गदर्शन, चर्चा आणि वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक अभ्यासकांचे येणे असते.पैकी बरेच जण माझ्या घरात कोणतेच फोटो- मुर्त्या नाहीत म्हणून अस्वस्थ होतात. माझ्याविषयीते काही अंदाज बांधू शकत नाहीत. उघडपणे विचारूही शकत नाहीत. मात्र अलिकडे तसे विचारणारा एक जण निघालाच. म्हणाला,सर एक विचारू का? तुमच्या घरात कोणत्याही ऐतिहासिक पुरूषाचा वा देवाचाही फोटोनाही. असे का?
मी तात्काळ म्हणालो, याचे कारण मला फोटो लावायचेअसतील तर सगळेच लावावे लागतील. एकटा दुकटा फोटोच का लावायचा? अमूक पासून अमूकपर्यंत मला फोटो लावावे लागतील असे मी म्हणालो तर त्यात तुम्हाला अभिप्रेत असलेली एखादीऐतिहासिक व्यक्ती माझ्या मनात आहे की नाही अशी शंका येऊ शकते. म्हणून मी सगळीचनावे घेण्याचा प्रयत्न करतो- काही नावे सुटण्याची शक्यता गृहीत धरून. ती नावे अशी:
येशूख्रिस्त, महम्मद पैगंबर (काबा), कृष्ण, राम, गौतम बुध्द, महावीर, गुरू नानक, गुरूगोविंदसिंग, चार्वाक, व्यास, वाल्मीक, कालिदास, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी,विवेकानंद, कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, गाडगे बाबा, चोखोबा,जनाबाई, कान्होपात्रा, छत्रपती शाहू, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, वि.रा. शिंदे, आगरकर, धोंडो केशव कर्वे, रघुनाथ कर्वे, राजाराम मोहन राय, लोकमान्यटिळक, महात्मा गांधी, सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ बाबासाहेबआंबेडकर, साने गुरूजी, विनोबा भावे, रविंद्रनाथ टागोर, वि. का. राजवाडे, जयप्रकाशनारायण, हमीद दलवाई, अँरिस्टॉटल, सिग्मंड फ्रॉइड, लिओ टॉलस्टॉय, शेक्सपिअर, कार्लमार्क्स, सॅम्युअल हॅनिमन, हिप्पोक्रेट, गॅलिलिओ, एडीसन, न्यूटन, आइन्स्टाइन या व्यतिरिक्तसगळे शास्त्रज्ञ, संशोधक, तत्वज्ञ, लेखक आदींचे फोटो मला लावावे लागतील. अर्थात तेअशक्य आहे असेही नाही.
छोट्याआकारातील खूप सारे फोटो एका फ्रेममध्ये घेऊन मी घरात लाऊ शकतो.
पण मला तशी गरज वाटत नाही.तसे करण्यात वेळ का घालवायचा? वर सांगितलेल्या लोकांचे विचार मी आमलात आणलेपाहिजेत. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. वरीलपैकी प्रत्येकाचे स्मारक मी माझ्याहृदयात बांधले पाहिजे. मी जागतिक महाकाव्य- इलियड रामायण महाभारत वाचली पाहिजेत. गीता,बायबल, कुराण, ग्रंथसाहिब, त्रिपिटीक, अवेस्ता असे सर्व धर्मग्रंथ समजून घेतलेपाहिजेत. शाहू, महात्मा फुले, आंबेडकरांची वै‍चारिकता जीवनात उपयोजित केली पाहिजे.असे झाले तर घरात एखादा फोटो लावण्याची गरज कोणालाच वाटणार नाही.

- डॉ. सुधीर रा. देवरे

 Name :
* Comment : Type in  
0/500
Top