Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 

लालरंग

 
By : Ramchandra Rane      On: September 10, 2017
469 Visits   
Report Abuse
http://ramukaka.globalmarathi.com
Search by Tags:  कविता
लाल रंग
क्षितीजापलीकडे पहाटेला
स्वयंम उधळतोस स्वागताला
तूच ठरतोस उजवा
दिनकर ठरे डावा
चराचर उठे लगबगीने
मावळतीला नेसी घाईघाईने
लालबुंद होऊनी देसी इशारा
विश्रांती घ्या झोपा असा सर्वाना
स्वभाव व्यक्तिमत्व चुंबकीय
मनोहर लोभस उत्सवी
चैतन्य प्रत्येकात तूच घडवि
चमकदार मळवट शोभतो ‘लयभारी”
देवी दुर्गेच्या पण भाळी
आयाबहीणींच्या असतोच शृंगारीच
तूच त्यांचे रूप खुलवी
सात्विकतेचे दर्शन घडवि
क्षणी ‘तू’ मातेला बनवि
‘आद्यशक्ती’’दुर्गा’’चंडी’’भवानी’
रत्ने प्रवाळ प्रसिध्द जगात
पुरावे सापडले उत्खननात
मोहंजोदाडो हडप्पा अजंठा वेरुळात
लालरंगा तुझाच वापर जास्त
भांडीकुंडी भित्तीचित्रे अन कपड्यात!
लाल रंग तूच जीवन
आता मानवाचे झाले ‘मानसिक प्रदूषण ‘
रक्त विभागले गटागटात
ना मिसळे एकमेंकात
लालरंगा तू आहेस धोक्यात?
लाल रंगा तुला लाल सलाम !Search by Tags:  कविता
 Name :
* Comment : Type in  
0/500
Top