'पद्मश्री' पुरस्कार विजेता प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याने मंगळवारी रात्री ताजमहाल हॉटेलमध्ये आपले 'गुण' उधळले. करीनासोबत जेवायला आलेल्या सैफचा गोंगाट वाढत गेला. त्याला आक्षेप घेणारे अनिवासी भारतीय व्यावसायिक इक्बाल शर्मा यांच्याशी त्याची बाचाबाची झाली आणि सैफने त्यांचे नाक फोडले.