Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

बर्फाचा कडा कोसळल्याने 7 जवान बेपत्ता

eSakal
Tuesday, January 24, 2012 AT 08:17 AM (IST)
श्रीनगर- कुपवाडा जिल्ह्यात बर्फाचा कडा कोसळल्याने सैन्याचे 5 जवान आणि सीमा सुरक्षा दलाचे 2 जवान वाहून गेल्याचे वृत्त आहे. कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ असलेल्या फार्कियान गलीमध्ये आज सकाळच्या सुमारास बर्फाचा कडा कोसळल्याने एका उपनिरीक्षकासह 7 जवान वाहून गेले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सैन्याकडून व्यापक शोध मोहीम राबविण्यात येत आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीनेही त्यांचा शोध घेण्यात येत आहे. यासंदर्भात श्रीनगरमधील सैन्याच्या 15 कॉर्पचे प्रवक्ते ले. कर्नल जे. एस. ब्रार म्हणाले,""कुपवाडा जिल्ह्यातील केरान भागात बर्फाचा कडा कोसळल्याने आमची एक सीमा चौकी वाहून गेली. चौकीत असलेल्या जवानांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे.'' गेल्या वर्षी गुलमर्गजवळ बर्फाचा कडा कोसळल्याने 15 जवान वाहून गेले होते.