ऍडलेड- ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख फलंदाज बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. मात्र त्यानंतर आलेल्या रिकी पॉंटिंग आणि मायकल क्लार्क यांनी दमदार फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. आज सकाळी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज वॉर्नर, मार्श आणि कोवन यांना सकाळच्या चहापानापर्यंत बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आल्याने सामन्यावरील भारताची पकड मजबूत झाली. आर. आश्विन आणि झहीर खान यांनी अनुक्रमे दोन व एक गडी बाद केले. त्यानंतर भारतीय भेदक गोलंदाजीत सातत्य दिसून आले नाही. त्यामुळे फलंदाजीला आलेल्या रिकी पॉंटिंग आणि क्लार्क यांनी दमदार फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर (चहापानापर्यंत) 3 बाद 214 धावा पॉंटिंग 91 (नाबाद), क्लार्क 71 (नाबाद)