जैतापूर - जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला बसला आहे. आचारसंहितेमुळे आज (मंगळवार) होणारे नियोजित आंदोलन 7 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. आचारसंहितेमुळे जेलभरो आंदोलनात सहभागी होता येणार नाही, असे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितले आहे. त्यामुळे आज आणि उद्या प्रकल्पाच्या समोर होणारे आंदोलन जिल्हा परिषद निवडणुका संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. तरीही काही ग्रामस्थ आंदोलन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.