Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

रामदेव बाबा महाठग - दिग्विजयसिंह

eSakal
Tuesday, January 24, 2012 AT 08:22 AM (IST)
लखनौ - कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या सभेत बुट भिरकावणारा व्यक्ती योगगुरू रामदेव बाबांशी संबंधित असल्याचा दावा करीत दिग्विजयसिंह यांनी रामदेव बाबा महाठग असल्याचा आरोप आज (मंगळवार) केला. दिग्विजयसिंह म्हणाले,""काळा पैसा पांढरा करण्यासाठी रामदेव बाबा यांनी कमिशन घेतले आहे. याबाबत अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. 100 कोटी रुपयांच्या या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. स्कॉटलंड येथील संपूर्ण बेट त्यांनी खरेदी केले आहे. त्यांच्याजवळ एवढा पैसा कुठून आला? त्यांनी आंदोलनासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेतल्याचे उघड आहे.'' उत्तरखंडमधील विकासनगर येथे एका व्यक्तीने राहुल गांधी यांची प्रचार सभा सुरू असताना त्यांच्या दिशेने बुट भिरकावला होता.