Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

आसाममध्ये सातशे दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण

eSakal
Tuesday, January 24, 2012 AT 08:17 AM (IST)
गुवाहाटी - बंदुकी खाली ठेवत नऊ दहशतवादी संघटनेच्या सातशे दहशतवाद्यांनी आज (मंगळवार) आसाममध्ये केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. आसाममधील गुवाहाटी शहरात झालेला आत्मसमर्पणचा उत्तर भारतातील सर्वांत मोठा कार्यक्रम ठरला. एकूण 676 दहशतवाद्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली आणि चिदंबरम यांना गुलाबाचे फूल दिले. तुम्ही तुमचा भुतकाळ मागे सोडा आणि भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा. आम्ही तुम्हीला खात्री देतो, की तुम्हाला समान पद्धतीने वागणूक दिली जाईल. तसेच, समाजात ताठ मानेने आणि आदराने जगण्याची ताकद देऊ, असे चिदंबरम या वेळी सांगितले. दहशतवाद्यांच्या नऊ संघटना या दोन मोठ्या आदिवासी संघटनांशी संबंधित होत्या.