Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

लॅपटॉप परत द्या; अन्यथा 20 हजार रुपये दंड

eSakal
Monday, January 23, 2012 AT 09:25 PM (IST)
मुंबई - मुंबई महापालिकेचा कारभार "हायटेक' करण्यासाठी नगरसेवकांना दिलेले लॅपटॉप परत दिले जात नाहीत. आतापर्यंत अवघ्या 35 नगरसेवकांनी लॅपटॉप परत दिले आहेत. लॅपटॉप परत न देणाऱ्या नगरसेवकांकडून 20 हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. मुंबईतील 227 नगरसेवकांना 53 हजार रुपये किमतीचे लॅपटॉप तीन वर्षांपूर्वी देण्यात आले होते. महापालिकेचे कामकाज "हायटेक' करण्यासाठी हा प्रयत्न केला होता मात्र काही मोजके नगरसेवक वगळता, अनेकांचे लॅपटॉप धूळ खात पडले होते. हे लॅपटॉप परत देण्यासही बहुतेक नगरसेवकांनी चालढकल चालविली असल्याचे समजते. अनेकांनी लॅपटॉप खराब झाल्याच्या किंवा हरविल्याच्या तक्रारी केल्या होत्या. आतापर्यंत फक्‍त 35 नगरसेवकांनीच लॅपटॉप प्रशासनाला परत केले आहेत. बाकीच्या नगरसेवकांकडून 20 हजार रुपये दंड मागण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. हे लॅपटॉप महापालिकेच्या शाळांना दिले जाणार आहेत.