Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

अजिंठा-वेरूळ महोत्सवाला औरंगाबादेत प्रजासत्ताकदिनी आरंभ

eSakal
Monday, January 23, 2012 AT 09:25 PM (IST)
मुंबई - औरंगाबाद येथे 26 ते 29 जानेवारी या काळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 'अजिंठा-वेरूळ महोत्सव' (एलोरा अजंता फेस्टिव्हल) आयोजित केला आहे. हा महोत्सव तीन वर्षांच्या खंडानंतर होत आहे. औरंगाबाद येथील सोनेरी महालात सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून पर्यटकांना सांस्कृतिक नजराणाच मिळणार आहे. अजिंठा-वेरूळ महोत्सवात 26 जानेवारीला "पूर्वसंध्या' या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या गाण्यांच्या मैफलीसह स्थानिक कलाकारांचे नृत्य-गायन-वादन अशी मेजवानी रसिकांना मिळेल. दुसऱ्या दिवशी, 27 जानेवारीला राजा-राधा रेड्डी आणि शालू जिंदाल कुचिपुडी नृत्य सादर करतील. त्याच दिवशी ख्यातनाम अभिनेत्री-नृत्यांगना हेमामालिनी आणि त्यांच्या कन्या ईशा आणि आहना देओल यांचे "बॅले' नृत्य होईल. विख्यात शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खान आणि आरती अंकलीकर यांच्या गायनाची मैफल 28 जानेवारीला जमणार असून पंडित राणू मुजुमदार यांचे बासुरीवादन आणि सुगतो भादुरी यांच्या मॅंडोलिनवादनाचा आस्वाद घेता येईल. पर्यटक आणि रसिकांना 29 जानेवारीला कैलाश खेर आणि कविता सेठ यांच्या सुफी गायनाचा आनंद लुटता येईल.