पुणे - ""एक काळ असा होता, आमच्यासकट सर्व जण आपण कुणबी नाही मराठा आहोत असे सांगायचे. ओबीसीसाठी आरक्षण निघाल्यापासून सर्वच जण कुणबी असल्याचे सांगू लागले. जे ज्या घटकात मोडतात, त्यांना ते आरक्षण मिळाले पाहिजे, असे माझे मत आहे,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. ते म्हणाले, ""माळी, धनगर, कुंभार, नाभिक यांसारखे घटक ओबीसीमध्ये आहेत. कुणबी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार प्रयत्न करीत आहेत. कोकण, विदर्भात कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अधिकारी 1920 पासूनचे पुरावे मागतात. अनेकांना हे प्रमाणपत्र मिळालेले नाही. आमच्या पक्षातील काही जणांना ते मिळालेले नाही. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरुण गिरे यांना ते प्रमाणपत्र मिळाले नाही. जात पडताळणी पत्र मिळाल्यानंतर त्या व्यक्तींना आरक्षित वॉर्डात उमेदवारी देण्याबाबत संबंधित पक्ष निर्णय घेतील.