Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना टोला

eSakal
Monday, January 23, 2012 AT 10:55 PM (IST)
मुंबई - शिवसेना फोडाफोडी करीत नाही पण काही जणांचा जन्मच फोडाफोडीच्या राजकारणातून झालेला आहे. अशा लोकांनी फोडाफोडीबाबत शिवसेनेवर टीका करण्यात काहीच अर्थ नाही, असा टोला आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांच्या उत्साहाचे "टॉनिक' मिळाले असून, शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांकडून आशीर्वादाचे "टॉनिक' मिळाले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांत सर्वत्र भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास उद्धव यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त "महाराष्ट्र देशा' व "पहावा विठ्ठल' या पुस्तकांच्या ई आवृत्त्यांचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात झाले. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेना नेते मनोहर जोशी, रामदास कदम, दिवाकर रावते, नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. परदेशी सोनिया गांधींना डोक्‍यावर घेणारी कॉंग्रेस भूमिपुत्रांवर सातत्याने अन्याय करीत आहे.