Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'समाजकल्याण न्यास'च्या स्पर्धेला 18 हजार धावपटू

eSakal
Monday, January 23, 2012 AT 09:10 PM (IST)
भिवंडी - "समाजकल्याण न्यास'तर्फे रविवारी पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील सात गटांमध्ये धावलेल्या 18 हजारांहून अधिक स्पर्धकांमुळे भिवंडी मॅरेथॉनमय झाली होती. मुलांच्या गटात रामनाथ मंगल व मुलींच्या गटात दिव्या सुरेश पाडवी यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेमुळे भिवंडी मॅरेथॉनमय झाली होती. न्यासचे अध्यक्ष सोन्या काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या वर्षी ही स्पर्धा झाली. कडाक्‍याच्या थंडीतही जमा झालेल्या 18 हजारांहून अधिक स्पर्धकांनी हजेरी लावली. त्यातील बहुसंख्य स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली. 18 वर्षांवरील मुलांच्या गटात रामनाथ लक्ष्मण मंगल याने प्रथम, अविनाश गुरुनाथ भोईर याने द्वितीय व यदुनाथ महादू याने तृतीय क्रमांक मिळविला तर मुलींच्या गटात दिव्या पाडवी हिने प्रथम, विद्या बाड हिने द्वितीय व पूजा पाडवी हिने तृतीय क्रमांक पटकावला. 18 वर्षांखालील मुलांमध्ये दिनेश गुरुनाथ म्हात्रे याने प्रथम, राहुल रामदास पाटील याने द्वितीय व अक्षय विलास घरत याने तृतीय क्रमांक पटकावला.