Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

एकाच दिवशी निकालाचा 30 तारखेपूर्वी निर्णय

eSakal
Monday, January 23, 2012 AT 09:55 PM (IST)
मुंबई - महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी देण्याबाबत 30 जानेवारीपूर्वी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. निवडणूक आयोगाने एक लाख 30 हजार मतदान यंत्रे खरेदी केली आहेत. प्रत्येक वॉर्डात 15 पेक्षा अधिक उमेदवार नसतील, तर इतक्‍या संख्येच्या मशिनद्वारे एकाच वेळी मतमोजणी करणे शक्‍य होईल. 15 पेक्षा जास्त उमेदवार असतील तर मतदान यंत्रांअभावी अडचण येईल. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वॉर्डनिहाय उमेदवारांची संख्या निश्‍चित होईल, तोपर्यंत मतमोजणीबाबत आत्ताच बोलणे योग्य होणार नसल्याचे सत्यनारायण यांनी स्पष्ट केले पण 30 जानेवारीपूर्वी याबाबत निश्‍चित निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.