Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राज यांना कल्याण न्यायालयात आज हजर राहण्याचे समन्स

eSakal
Monday, January 23, 2012 AT 10:10 PM (IST)
कल्याण - रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या अमराठी विद्यार्थ्यांना कल्याण रेल्वे स्थानकात मारहाण केल्याप्रकरणी कल्याण रेल्वे न्यायालयात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी राज ठाकरे यांनी कल्याण रेल्वे न्यायालयात मंगळवारी (ता. 24) हजर राहावे याकरिता न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहे. सप्टेंबर 2008 मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या अमराठी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. या गुन्ह्यात सह आरोप मनसेचे अध्यक्ष ठाकरे यांच्यावर ठेवण्यात आला होता. रेल्वे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून त्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. त्यासाठी ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. सध्या मुंबई, ठाणे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेले राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार की नाही, याविषयी सुस्पष्टता नाही.