Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

वैद्यकीय प्रदर्शन मार्चमध्ये मुंबईत जगभरातील 300 कंपन्यांचा सहभाग

eSakal
Monday, January 23, 2012 AT 09:25 PM (IST)
मुंबई - अठरावे भारतीय वैद्यकीय प्रदर्शन (मेडिकल फेअर इंडिया) मुंबईत 2 मार्च 2012 पासून भरणार आहे. गोरेगाव (पूर्व) येथील "बॉम्बे एक्‍झिबिशन सेंटर'च्या प्रांगणातील तीन दिवसांच्या या प्रदर्शनाचा भर रुग्णांचे पुनर्वसन आणि नवीन उपकरणे यावर राहील. जर्मनीतील मेस्से ड्युसेलडार्फ जीएमबीएच या ख्यातनाम कंपनीने भारतातील तिच्या उपकंपनीच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. भारतासह फ्रान्स, अमेरिका, बेल्जियम, अमेरिका, चीन, जर्मनी, जपान, फिनलंड आणि आग्नेय आशियाई देशांतील सुमारे 300 वैद्यकीय उपकरण निर्मात्या कंपन्या प्रदर्शनात सहभागी होतील. रुग्णालयांत वापरली जाणारी यंत्रसामग्री, शस्त्रक्रियेची उपकरणे, फर्निचर, रेडिओलॉजी व फिजिओथेरपी उपकरणे, मेडिकल सॉफ्टवेअर व वैद्यकीय प्रकाशने प्रदर्शनात पाहण्यास मिळतील. गेल्या वर्षी 17 व्या वैद्यकीय प्रदर्शनाला सहा हजारपेक्षा अधिक व्यक्तींनी भेट दिली होती. या वर्षी त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. भारतातील आरोग्य क्षेत्रामधील वार्षिक उलाढाल गतवर्षी 40 अब्ज डॉलर होती. ही उलाढाल 2012 मध्ये 78.6 अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा औषध उद्योगातील पाहणीचा अंदाज आहे.