Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'मोनो'ची विद्युतचाचणी पुढे ढकलली

eSakal
Monday, January 23, 2012 AT 10:10 PM (IST)
मुंबई - चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल (संत गाडगे महाराज चौक) या मार्गावर प्रस्तावित असलेल्या देशातील पहिल्या मोनोरेलसाठी आज (ता. 23) नियोजित असलेली विद्युत पुरवठ्याची चाचणी काही कारणास्तव होऊ शकली नाही. नियमित स्वरुपाची असलेली ही चाचणी येत्या काही दिवसांत होईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मोनोरेलच्या चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्याच्या मार्गात वडाळा आणि म्हैसूर कॉलनी या स्थानकांदरम्यान वीजप्रवाह वाहून नेणाऱ्या वाहिन्या बसवण्यात आलेल्या आहेत. या वीजवाहिन्यांतून विद्युतपुरवठा नीट होतो की नाही, एवढेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या चाचणीतून तपासण्यात येणार आहे. मात्र, त्यात उच्च दाबाचा वीजपुरवठा होणार असल्याने या चाचणीच्या वेळी नागरिकांनी या टप्प्यातील 4.5 कि.मी.च्या "कॉंक्रीट गाईड-वे बीम'जवळ जाऊ नये, असे आवाहन एमएमआरडीएने केले होते. चाचणीच्या "न्यूज फॅश'मुळे गोंधळ केवळ वीजवाहिन्यांची चाचणी नियोजित असताना आज (ता. 23) सकाळी एक-दोन वृत्तवाहिन्यांनी मोनोरेलचीच चाचणी होणार असल्याचा "न्यूज फ्लॅश' चालवला.