Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

नरेंद्र मोदींची बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

eSakal
Monday, January 23, 2012 AT 09:55 PM (IST)
नरेंद्र मोदींची बाळासाहेबांवर स्तुतिसुमनेमुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 85 व्या वाढदिवसाला शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या "सामना'त गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा खास लेख प्रसिद्ध करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुजरातप्रेमाची धार बोथट करण्यात आली आहे. मोदी यांच्या बाळासाहेबांवरील स्तुतिसुमनांनी राज यांच्या गुजरातप्रेमाला लगाम घालण्याचा डाव शिवसेना नेतृत्वाने रचल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. गुजरातचा दौरा केल्यावर तेथील विकासाचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भरभरून कौतुक केले होते. मुंबईतील गुजराती समाज आणि या समाजाची मतांचे महत्त्व ध्यानात घेता राज यांची गुजरात राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची वाढती सलगी शिवसेनेला मानवणारी नव्हती. या वाढत्या सलगीचा परिणाम महापालिका निवडणुकीत गुजराती मतदारावर होऊन काही अंशी गुजराती मते मनसेकडे वळण्याची भीती शिवसेनेला वाटत होती. यावर उपायोजना करण्याची अचूक संधी शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साधली. बाळासाहेबांच्या 85 व्या वाढदिवशी नरेंद्र मोदी यांच्याकडून विशेष लेख लिहून घेण्यात शिवसेना नेतृत्व यशस्वी ठरले.