
मुंबई - राज यांच्याकडे शिवसेनेचे मन ओळखण्याचे यंत्र आहे का, असा प्रश्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेचे राज ठाकरे यांचे नाव न घेता उपस्थित केला आहे. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची रुद्राक्ष तुला करण्यात आली. या वेळी त्यांनी राज यांना टोला लगाविला. हरल्याने शिवसेना फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याची टीका केल्याचे आज बाळासाहेबांच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी त्याच्याकडे शिवसेनेचे मन ओळखण्याचे यंत्र आहे का, अशी विचारणा केली. त्याचवेळी आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली असली तरी त्यामुळे आपल्या आणि शरद पवार यांच्या मैत्रीमध्ये फरक पडणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. त्यानंतर परांजपे यांच्याबाबत "राष्ट्रवादी'ने असे का केले, हे त्यांनाच जाऊन विचारा, असे बाळासाहेबांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फोडाफोडीचे राजकारण चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांचा वाढदिवस हा सण असतो.