Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मतदारांना पालखीचा मान

eSakal
Monday, January 23, 2012 AT 10:40 PM (IST)
मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मतदारांना पालखीचा मान मिळणार आहे. मतदान केंद्र इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असल्यास अपंग, वृद्ध आणि आजारी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मतदान केंद्र इमारतीच्या तळमजल्याऐवजी पहिल्या मजल्यावर असल्यास अपंग तसेच वृद्ध मतदारांना मतदान करणे कठीण होते. अशा मतदारांना त्यांचा हक्क बजावता न आल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. या समस्येवर तोडगा म्हणून अशा मतदारांना पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी पालखीची सोय करण्यात आली आहे. मतदारांनी मागणी केल्यास त्यांना पालखीतून पहिल्या मजल्यावर नेले जाईल, असे महापालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी आज सांगितले. मतदान केंद्र शक्‍यतो तळमजल्यावरच असावीत, यासाठी महापालिकेने 150 गृहनिर्माण संस्थांशी पत्रव्यवहार केला होता मात्र त्याला अवघ्या 11 संस्थांनीच मान्यता दिली असून, 28 ठिकाणी मतदान केंद्रे पहिल्या मजल्यावर आहेत. बेघरांना मतदानाचा अधिकार राजकीय पक्षांचा विरोध डावलून यंदा महापालिका निवडणुकीत बेघरांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.