मुंबई - 'एक दिवाना था' या आगामी सिनेमातील 'होसाना...' या गाण्याला ख्रिश्चन सेक्युलर फोरम (सीएसएफ)ने आक्षेप घेतल आहे. ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलेले हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले आहे. या गाण्यातील 'होसाना' या शब्दालाच आक्षेप घेण्यात आला आहे. हा शब्द खिश्चन आणि ज्यूंच्या प्रार्थनांमध्येच उच्चारला जातो, असे सीएसएफचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत ए. आर. रेहमान यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एक दिवाना था हा "विन्नतंडी वरुवय्या' या सिनेमाचा हिंदी रिमेक असून काही वर्षांपूर्वी तो दक्षिणेत प्रदर्शित झाला आहे. त्या सिनेमातील गाण्यातही "होसाना' हा शब्द होता पण त्या वेळी तिथे कोणीही आक्षेप घेतला नाही. पण या गाण्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या आहेत. त्या विषयी मला चिंता वाटते, असे रेहमान यांनी म्हटले आहे. तसेच यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही, असे गीतकार जावेद अख्तर यांनी स्पष्ट केले आहे.