Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

स्वच्छतेची लोकचळवळ

Mahanews
Monday, December 05, 2011 AT 09:04 AM (IST)
मानवतेचा संदेश देणारे समाजसुधारक संत गाडगेबाबा यांनी करुणा जपली आणि प्रेरणा दिली. त्या प्रेरणेतून विदर्भाच्या प्रवेशव्दारी बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर नगरीत श्री गाडगेबाबा विचार मंचाचा जन्म झाला व मानवतेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून या विचारमंचाने आगळीवेगळी श्रमदानाची चळवळ राबविली. यातून वर्षभरात ३५ ते ४० सार्वजनिक ठिकाणे सुंदर व स्वच्छ झाली.

आज गावागावात, रस्त्या-रस्त्यांवर, घराघरांत साचलेली घाण, चिखल, कचरा, प्रदूषण साफ करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणावर अवलंबून न राहता आपण स्वतः पुढे सरसावणे हाच यावर उपाय आहे, असा संदेश या विचारमंचाने आपल्या कृतीतून दिला आहे.

मलकापूर नगरीतील नळगंगेच्या परिसरात एका खडकावर पौराणिक शिवालय श्री गंगेश्वर मंदिराच्या नावाने होते. त्याचा जीर्णोध्दार (कै.) महादेव लोटूजी वाघ यांनी केला होता. नळगंगेच्या पुराने पुन्हा ते पडले. त्यानंतर राजाभाऊ कंडारकर यांनी काही साथीदारांना घेऊन त्याचा १९९९ साली जीर्णोध्दार केला. आज प्राचीन शिवालय सुंदर मंदिरासह प्रशस्त आवारासहित सांस्कृतिक, सामाजिक सर्वधर्म समभावाचे, उपक्रमाचे केंद्रच झाले आहे. येथे पोळा, शिवरात्री, स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार (कै.) के.ना. सावजी व्याख्यानमालेसमवेत श्री गाडगेबाबा यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी साफसफाई व प्रबोधनपर कार्यक्रम होत होते. तेथेच श्री गाडगे महाराज विचारमंचाचा जन्म झाला व मलकापूर नगरीत एक आगळीवेगळी लोकचळवळ उभी राहली.

येथील शिवाजीनगर भागातील (कै.) नर्मदाबाई शिंदे स्मशानभूमीतील वाढलेले गवत, काट, अस्वच्छता पाहून श्री गाडगेबाबा विचारमंचाचे जनक राजाभाऊ कंडारकर यांच्या मनात साफसफाईची कल्पना आली. नऊ जण कुदळ, फावडे, विळा, टोपले घेऊन तेथे पोचले. त्यांनी स्वच्छता केली. तेव्हा काही काळ ही चळवळ चालेल व एखादे ठिकाण साफ करुन ती संपेल असे वाटले होते. परंतु दर बुधवारी व रविवारी सकाळी दोन तास ही चळवळ जणू लोकचळवळ बनत गेली. त्यातील सदस्यांची संख्याही ८०-९० च्या घरात पोहोचली.

श्री. गाडगेबाबा यांचा खराटा हातात घेतल्याने अनेकांचा अहंकार गळाला. सार्वजनिक ठिकाण, रस्ते यावर साचलेली घाण, चिखल, कचरा, काट, नाल्या साफ करण्यासाठी विळा, फावडे, कुदळ, टोपले घेऊन मग शिवाजीनगर भागातील स्मशानभूमी, लक्ष्मण चव्हाण वैकुंठधाम, हुतात्मा स्मारक, एसटी स्टॅण्ड, उपजिल्हा रुग्णालय, न्यायालय, पोलीस स्टेशन, बोहरा समाज स्मशानभूमी, पाणीपुरवठा विभाग, चाळीस बिघा गार्डन, नगरपालिका शाळा, तहसील, जयस्तंभ अशी जवळपास ४० ठिकाणे वर्षभराच्या ९६ तासात राबलेल्या आठ हजारावरील हातांनी संपूर्ण परिवर्तित करुन आगळीवेगळी एक लोकचळवळ उभी केली आहे.

हा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांनीही घ्यावा, अशी येथील मंडळाची अपेक्षा आहे.
स्वच्छतेची लोकचळवळ

प्रतिक्रिया
 
On 31/10/2014 11:47 PM ruchira sawant said:
स्वचथा आरोग्याची गुरुकिल्ली

 
On 31/10/2014 11:26 AM अविनश तकंखर said:
स्व्छता हि मनातु हवि

 
On 29/10/2014 07:47 PM sahil worlikar said:
स्वचाता हि मानवाची गुरुकिल्ली

 
On 18/10/2014 07:17 PM om rubde said:
gav bhala tar desh bhala

 
On 18/10/2014 07:17 PM om rubde said:
gav bhala tar desh bhala

 
On 03/10/2014 01:45 PM manohar jagtap. said:
it is very needful for future generation...

 
On 02/10/2014 10:07 AM shinde Nilesh said:
its a need of future

 
On 01/10/2014 10:07 PM Salman pathan said:
दैवाने हिरावले—पण अथक प्रयत्नाने जीवन सुधारले हळदीचे माहेरघर असलेले एक गाव जंगलसंवर्धनासाठी अनोखा उपक्रम महिला शक्तीमुळे दारू हद्दपार अंतरीची तळमळ आणि लोकांचा विश्वास जिंकला : नीलिमा मिश्रा

 
On 29/09/2014 07:20 PM reshma said:
स्वच्छता दिसे जिथे परमेश्वर वसे तिथे.

 
On 23/06/2014 12:11 PM sunil kale jalna said:
आपले गाव स्वतचा परिसर साफ करणे मनजेच इश्वर सेवा होई

 
On 24/01/2014 02:50 PM ..AKshay sable said:
well

 
On 01/01/2014 06:45 PM Vijay binage Pahale apana ghar swach said:
Pahale ghar swach

 
On 27/11/2013 09:59 PM Ganesh jadhav said:
mast चालाय tumch

 
On 27/11/2013 09:59 PM Ganesh jadhav said:
mast चालाय tumch

 
On 31-01-2013 06:08 PM Pushpa Joshi said:
माणसांची घाणेरडी वृत्ती केव्हा हद्दपार होणार???

 
On 06/12/2011 12:39 PM pradeep athavale said:
स्वच्छते संबंधी चार शब्द सांगण्यास लागावेत ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची दुरवस्था , जनतेची अनास्था दर्शवणारी गोष्ट आहे.माणसाने माणसासारखे जगावे अशी साधी अपेक्षा करणे यात गैर काय ??