Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

GlobalMarathi
Monday, August 01, 2011 AT 02:17 PM (IST)
Tags: Sharavan,   Balkavi
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरती बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

- बालकवी
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

प्रतिक्रिया
 
On 19/09/2013 11:50 AM said:
ठुम्ब्स उप

 
On 17/08/2013 01:37 PM yogita sonawane said:
सुरवाती पासून शेवट पर्यंत श्रावण महिन्यातील सर्व नैसर्गिक व मानवी वर्तनांचा सुनार वर्णन केले आहे..............!

 
On 29/07/2013 02:36 PM ANIKET said:
खूप CHAN

 
On 13/07/2013 01:49 PM kirti said:
fab

 
On 04/09/2012 04:33 PM ganesh n rathod said:
हि कविता खूपच चांगली आहे हि कविता वाचून आनंद झाला मन उलाहासित झाले , मन भरून आले .

 
On 05/08/2012 03:02 PM shubhangi said:
शारावानातला आनद जो असतो तोच यातून बालकाविनी सांगितलं आहे प्रतेकाला आनद होतो आणि सर्व उस्तवानमध्ये प्रतेक जन गुंतून जातो .शाराव्नातील वातावरण हे प्रसन्न असते म्हणूनच आध्य्त्मिकता येते .

 
On 26/07/2012 12:24 PM ashu said:
खुपच छान ? निसर्ग सौंदर्य शब्दात पकडण्याची किमया बालकवीच करू शकतात. अशाच कविता असाव्यात .

 
On 20/07/2012 04:18 PM vidya said:
shravan mahinyache sundar varnan kelele aahe

 
On 03/10/2011 08:08 PM vaishnavi said:
खूप छान अशा शब्दात बालकवी यांनी निसर्गाचे वर्णन केले आहे . बालकवी हे एक देवा घरून आलेली भेट आहे. excelent job !!!!!!!hats of to you.

 
On 03/08/2011 07:47 PM Balwant Ranade said:
निसर्ग सौंदर्य शब्दात पकडण्याची किमया बालकवीच करू शकतात.

 
On 03/08/2011 07:47 PM Balwant Ranade said:
निसर्ग सौंदर्य शब्दात पकडण्याची किमया बालकवीच करू शकतात.

 
On 03/08/2011 06:52 PM विजय सबनीस said:
जेव्हा काळजात संवेदना झंकारते तेव्हा लेखणीतून अशी कविता उतरते.

 
On 03/08/2011 09:09 AM ratnakar said:
शब्द चित्र तेही निर्सगाच्या सौंदर्याचं - इतकं अप्रतिम! प्रत्येक ओळीसाठी एक समर्पक सुंदर छायाचित्र शोभून दिसलं असतं

 
On 02/08/2011 09:14 PM Dr.Shantanu Chindhade said:
Excellent and very apt analysis of Balkavi's poem.In fact Poet Mardhekar said that in true sense Balkawi was the only real poet of Marathi.What else can we add to this, Thanks, Shantanu Chindhade,Pune

 
On 02/08/2011 04:56 PM pradeep athavale said:
Very many classical English Poets including Shelley, Wordsworth pail in front of this master craftsman. He may be compared only with Classical Sanskrit Yeomen like Kalidasa, Bhasa, Bhawbhuti. Thombre, alias BALAKAWI's Poetical exuberance reaches the zenith to the extent THAT none other can hold a candle to him, that's my Humble opinion of this Great Savant, Poet ; Balakawi. Melody,Harmony go hand in hand as he mellifluously weaves his word-craft around lofty ideas descending from Poetic heavens.

 
On 02/08/2011 04:37 PM pradeep athavale said:
अहो, ह्या कवितेवर काय लिहू आणि काय नाही अशी माझी अवस्था झाली आहे, म्हणजे नेहेमीच होते. मराठी काव्यातला एक रसरशीत उन्मेष जो मऱ्हाटी काव्यप्रांतातील चिरंतन ठेवा म्हणता येईल. अशा ह्या ठोम्ब्र्यान्प्रती नतमस्तक होऊ या.

 
On 02/08/2011 04:31 PM pradeep athavale said:
आचार्य अत्र्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे " यावच्चंद्र दिवाकरौ असा कवी होणे नोहे "! काय तो भाषेचा डौल,शब्दांची अचूक फेक,सगळं कसं मोत्याच्या कणसासारखं. वाचत , गात जावे,धन्य व्हावे.

 
On 02/08/2011 04:25 PM pradeep athavale said:
भाषाप्रभु म्हणजे बालकवी असे समीकरण मांडले तर सर्व जाणते मान डोलावतील. अशा गोड गोड भाषेला प्रसवणारे ठोंबरे यांचे चित्र कवितेबरोबर असायचे ते मात्र गंभीर मिशाळ बाप्याचे.ज्याला बघितल्यावर धडकीच भरावी! त्या जगन्नियन्त्याची किती कमाल आहे नाही? ते म्हणे बायकोला विचित्र वागवायचे.अर्थात तो जमाना च वेगळा होता.आपण फक्त कलाकृती बघायची,कवीची आणि देवाची!!

 
On 02/08/2011 04:15 PM pradeep athavale said:
"बलाकमाला उडता गगनी भासे कल्पसुमांची माळची ते! "(पाठभेद!) आता मी ६७ वर्षांचा बालक झालो. ८-९ वर्षांचा असताना शाळेत वरील कविता हातवारे करत पाठ म्हटलेली आठवते."बगळ्यांची माळ उडे फिरुनी अंतरांत!" अभिजात संस्कृत काव्यातील हे संज्ञाप्रवाह अलगदपणे मराठीत कसे उतरले आहेत हे बघणे अत्यंत आनंददायी आहे! नभ मेघांनी आच्छादले असताना भर दुपारी,धूसर प्रकाशात स्वच्छ पांढरे लख्ख पक्षी,त्यांचे जिवंत लावण्य,लयबद्ध हालचाली, सर्व कसे मोहवून टाकणारे. अशा अनेकानेक संज्ञा प्रसवणारे धन्य ते ठोंबरे उर्फ बालकवी!