Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
रंगमंचावर अवतरले "हलव्याच्या दागिन्या'तील विजेते
eSakal
Monday, November 29, 2010 AT 08:40 PM (IST)
पुणे - नवदांपत्याचे, तान्हा बाळाचे कोडकौतुक करण्यासाठी बनविण्यात येणारे हलव्याचे दागिने हे संक्रांतीचे खास वैशिष्ट्य. सोमवारी हेच दागिने घालून रंगमंचावर विजेते आल्याने नोव्हेंबर महिन्यातच संक्रांत साजरी होत असल्याचा आनंद बालगंधर्व रंगमंदिर येथील उपस्थितांना झाला. निमित्त होते, खाऊवाले पाटणकरांतर्फे आयोजित "हलव्याच्या दागिन्यांनी सजलेल्यांच्या स्पर्धे'तील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्याचे. या वेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, अभिनेते आनंद इंगळे, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अभिनेते श्रीधर प्रसाद भावे, खाऊवाले पाटणकरचे रमेश पाटणकर, रोहिणी पाटणकर उपस्थित होते. (कै.) वसंतराव पाटणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा "सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' या वेळी "सूर्योदय एड्‌स फाउंडेशन'ला प्रदान करण्यात आला. फाउंडेशनच्या प्रकल्प प्रमुख तेजस्विनी थिटे यांनी तो स्वीकारला. चिरमुले म्हणाल्या, ""संस्कृती जपली पाहिजे असे भाषणात म्हटले जाते, पण खाऊवाले पाटणकर ती खऱ्या अर्थाने जपत आहेत. नात्यांचा, भावनांचा कौतुक सोहळा पाहताना आनंद होत आहे.