Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पाककृती - रगडा पॅटिस

GlobalMarathi
Tuesday, October 05, 2010 AT 04:18 PM (IST)पॅटिस :-

साहित्य :-
१. बटाटे ३-४
२. हळद,तिखट, मीठ, चवीनुसार
३. ब्रेड स्लाईस् २
४. तेल पॅटिस भाजण्यासाठी

कृती :-
बटाटे उकडुन किसून घ्यावेत.
त्यात हळद, तिखट्, मीठ आणि पाण्यात भिजवून काढलेले ब्रेड स्लाईस् घालून व्यवस्थित एकजीव करावे.
हव्या त्या आकाराचे पॅटिस बनवून तेलावर भाजून घ्यावेत.

रगडा
साहित्य :-
१. पांढरे वाटाणे २ वाटी (रात्रभर किंवा ६-७ तास भिजवून ठेवावेत.)
२. तिखट,
३. छोले मसाला,
४. मिठ चवीनुसार
५. मोहरी
६. हिंग थोडासा.
७. कांदा १ (बारिक चिरलेला)
८. टोमॅटो १ (बारिक चिरलेला)
९. तेल फोडणीसाठी

कृती :-
भिजवलेले वाटाणे कुकरला शिजवुन घ्यावेत.
एका भांड्यात तेल तापत ठेऊन त्यात मोहरी, हिंग, हळद आणि कांदा घालून भरपूर परतावे.
नंतर टोमॅटो घालून त्यावर आवडीप्रमाणे तिखट, छोले मसाला घालावा.
मग शिजवलेले वाटाणे घालावेत.
शेवटी मीठ घालून पुष्कळ उकळावे.

इतर साहित्य :-
१. चटणी,
२. बारिक चिरलेला कांदा,
३. कोथिंबीर
४. शेव

चटणी :-
साहित्य :-
१. भिजवलेली चिंच
२. खजुर,
३. गुळ,
४. मीठ,
५. तिखट,
६. थोडासा पुदिना

कृती :-
वरिल सर्व साहित्य एकत्र मिक्सर मधुन काढावे.
एका बाऊल मध्ये पॅटिस मग रगडा त्यावर चटणी, कांदा, कोथिंबीर, शेव घालुन खायला द्यावे.
पाककृती - रगडा पॅटिस

प्रतिक्रिया
 
On 18/12/2013 11:17 AM chanda said:
खूप मस्त .

 
On 18/12/2013 11:17 AM chanda said:
खूप मस्त .

 
On 18/12/2013 11:16 AM chanda&rajendra said:
खूप मस्त .

 
On 18/12/2013 11:09 AM chanda&rajendra said:
खूप मस्त .

 
On 27/02/2013 09:44 AM seema said:
खूप छान रेसिपी आहे नक्की करून पाहते

 
On 26/02/2013 04:39 PM seema said:
खुप छान रेसिपी आहे

 
On 24/01/2013 05:58 PM PRAJAKTA said:
या SUNDAYLA नक्की करून पाहते

 
On 11/07/2012 05:22 PM Meghana said:
खूप छान पदार्थ आहे.

 
On 27/12/2011 05:31 PM Alpana Aher said:
मस्त आहे अप्रतिम आणि फोटो पण सुपर आहे चव हि भारी असेल मी करून पाहते thanks for it

 
On 15/10/2011 11:56 AM priya said:
bakwas

 
On 21/05/2011 09:03 PM Sachin khatu said:
फालतू

 
On 25/02/2011 01:53 PM Dhanashri said:
This recepi is to goodBookGanga