Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
पाककृती - फ्रूट सलाड
GlobalMarathi
Tuesday, October 05, 2010 AT 03:53 PM (IST)साहित्य :-

१) तीन वाट्या दाट दूध
२) एक वाटी साखर

फळे :-
१) टरबूज
२) केळी
३) पपई
४) सफरचंद
५) द्राक्षे
६) संत्री
७) चिक्कू
८) अंजीर
९) डाळिंबाचे दाणे
१०) हापुस आंब्याच्या फोडी
११) स्ट्रॉबेरी (फक्त सजावटीसाठी)

कृती :-
एका पातेल्यात दूध घेऊन ते मध्यम आचेवर तापवत ठेवावे. दूध तापले की त्यात साखर घालावी व चांगले उकळू द्यावे. उकळल्यावर दूध वर येईल. डावाने दूध सतत ढवळत रहावे. दूध निम्मे आटले की गॅस बंद करावा. दूध गार झाले की फ्रीज मध्ये ठेवावे.
सर्व फळांच्या साली काढून बारीक चिरून घ्यावीत. नंतर चिरलेल्या फळामध्ये आटीव दूध घालावे.
केशराच्या काड्या तव्यावर/कढल्यात गरम करून त्या गार दूधात चुरडून ते दूध घालावे. रंग छान येतो. केशर कोणत्याही पदार्थात घालताना असेच घालावे.
दुध थोडे व फळे जास्त असे प्रमाण आहे. पण सर्व फळे दूधामध्ये बुडतील इतपत दूध घालावे. फळे आवडीप्रमाणे कमी जास्त घालावी. साधारणपणे संत्र आणि मोसंबी दुधात पहिल्यापासून एकत्र करू नये. खायला द्यायच्या आधी १० मिनिटे ती फळे एकत्र करावीत.
स्ट्रॉबेरी फक्त सजावटीसाठी आहेत. आंबट फळे दूधात घालू नयेत. आंबटगोड फळे चालतील. आवडीप्रमाणे दूध जर जास्त दाट हवे असेल तर त्यात कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर अथवा कंडेन्स्ड मिल्क घालू शकतो.
असे हे फ्रूट सॅलड तयार झाले की परत फ्रीजमध्ये ठेवावे.
थंडगार फ्रूट सॅलड जेवणानंतर खायला द्यावे.

प्रतिक्रिया
 
On 23/10/2013 04:25 PM Devaki Pandit said:
SImple & Easy Fruit Salad...I like..Thank u

 
On 16/02/2013 04:25 PM madhuri Vetal said:
Its too much simple and Yam-mi....... I like it.....