Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
गांधीजींची तत्त्वे आणि लेखन
GlobalMarathi
Saturday, October 02, 2010 AT 12:30 AM (IST)
सत्य
गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रसिद्ध आहे. गांधीजींनी म्हटले आहे की, सर्वात महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. "परमेश्वर सत्य आहे." असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी ते, "सत्य (हेच) परमेश्वर आहे." असे बदलले.

अहिंसा
जरी अहिंसेचे तत्व गांधीजींनी स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते प्रथमच व्यक्ती होते. हिंदू, बौद्ध, जैन, ज्यू धर्मात अनेक ठिकाणी अहिंसेच्या तत्वाचा उल्लेख आहे. "माझे सत्याचे प्रयोग" मध्ये गांधीजींनी त्यांचे अहिंसेचे तत्वज्ञान मांडले आहे. ते म्हणतात,

"जेव्हा मी निराश होतो, तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. (इतिहासात) अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे - विचार करा, नेहमीच."
"विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली - (त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?"
"डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला आंधळे करून सोडेल."
"अशी अनेक ध्येयं आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन."

पण गांधीजींना माहित होते की, अहिंसेचे या पातळीपर्यंत पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक आहे आणि प्रत्येकाजवळच ते असणे शक्य नाही. त्यामुळे ते सल्ला देत की प्रत्येकाने अहिंसेचे पालन करणे आवश्यक नाही, विशेषतः जर अहिंसा भित्रेपणाला झाकण्यासाठी वापरण्यात येत असेल तर.

स्वदेशी , शाकाहार
लहानपणी अनेकदा गांधीजींनी मांस भक्षण केले होते. ते मुख्यत्वेकरून त्यांच्या कुतुहलामुळे तसेच त्यांचा मित्र शेख मेहताब याच्या सांगण्यावरून होते. शाकाहाराची कल्पना हिंदू तसेच जैन प्रथांमध्ये खोलवर रुजली आहे. तसेच गांधीजींची जन्मभूमी गुजरातमध्ये बहुतांश हिंदू आणि सर्व जैन शाकाहारी होते आणि गांधीजींचे कुटुंबही याला अपवाद नव्हते. लंडनला शिकायला जाण्याआधी गांधीजींनी त्यांची आई पुतळीबाई आणि काका बेचारजी स्वामी यांना वचन दिले होते की ते मांस, बाई व बाटली (दारू) यांच्यापासून दूर राहतील.

पुढे गांधीजी कडक शाकाहारी बनले. त्यांनी "मोराल बेसिस ऑफ व्हेजिटेरिअनिझम" (Moral Basis of Vegetarianism) हे पुस्तक लिहिले आहे तसेच शाकाहारावर अनेक लेखसुद्धा लिहिले आहेत. त्यातील काही लेख लंडन व्हेजिटेरिअन सोसायटीच्या "द व्हेजिटेरिअन" या प्रकाशनातून प्रसिद्ध झाले आहेत.

लिखित पुस्तके
गांधीजींनी विपुल लेखन केले आहे. अनेक दशकांसाठी त्यांनी बर्‍याच वर्तमानपत्रांचे संपादन केले. यामध्ये गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमधील हरिजन, दक्षिण आफ्रिकेमध्ये असतांना इंडियन ओपिनियन आणि भारतात परत आल्यावर इंग्रजीमधील यंग इंडिया, गुजराती मासिक नवजीवन यांचा समावेश आहे. नंतर नवजीवन हिंदीमधून पण प्रकाशित केले गेले. या बरोबरच, ते जवळपास प्रत्येक दिवशी अनेक वर्तमानपत्रांना आणि व्यक्तींना पत्रे लिहीत असत.

गांधीजींनी अनेक पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रकाशित आहे. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षावर त्यांनी "Satyagraha in South Africa (दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह)" हे पुस्तक लिहिले आहे.

तसेच त्यांनी "हिंद स्वराज" किंवा "Indian Home" ही राजकीय पुस्तिका लिहिली आहे आणि जॉन रस्किनच्या "Unto This Last" चे गुजराती भाषांतर केले आहे. हा शेवटचा लेख त्यांच्या अर्थशास्त्रावरील विचारसरणीचे वर्णन करतो. त्यांनी शाकाहार, आहार आणि स्वास्थ्य, धर्म, सामाजिक परिवर्तन इत्यादी विषयांवरसुद्धा विपुल लेखन केले आहे. ते सामान्यतः गुजरातीमध्ये लिखाण करत, पण त्यांच्या पुस्तकांच्या हिंदी आणि इंग्रजी भाषांतरांचे परिक्षणसुद्धा ते करत असत.


गांधीजींचे पूर्ण लेखन भारत सरकारने "संकलित महात्मा गांधी" (The Collected Works of Mahatma Gandhi) या नावाखाली १९६०च्या दशकात प्रकाशित केले आहे. यामध्ये जवळपास १०० खंड व ५०,००० पाने आहेत. इ.स. २००० मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधित आवृत्तीवरून अनेक वाद झाले होते. सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यात बदल केले आहेत असा आरोप गांधीजींच्या अनुयायांनी केला होता.गांधीजींवरील पुस्तके

अनेक चरित्रकारांनी गांधीजींचे चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील दोन चरित्रे उल्लेखनीय आहेत. डी. जी. तेंडुलकर यांचे आठ खंडातील "Mahatma. Life of Mohandas Karamchand Gandhi" आणि प्यारेलाल आणि सुशिला नायर यांचे दहा खंडातील "महात्मा गांधी". अमेरिकेच्या सैन्यदलातील कर्नल जी. बी. सिंग यांनी नुकतेच गांधीजींवर टिका करणारे पुस्तक Gandhi: Behind the Mask of Divinity प्रकाशित केले आहे. पण त्याला शैक्षणिक जाणकारांकडून खूप कमी पाठिंबा मिळाला आहे. मराठीमध्ये पु. ल. देशपांडे यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे.

प्रतिक्रिया
 
On 03/08/2017 11:30 PM Adv. Padma Ramchandra Khude said:
This is very nice that we can know all the legents, their childhood, education, and social work through this enternet media. We can teach all about then to our children and as well as to all family members, friends and the persons around us.

 
On 30/07/2017 09:44 AM Dhanashri Khairnar said:
very nice

 
On 30/07/2017 09:44 AM Gorak Ganpat hire said:
All information it's very very very Like I.....and my all family

 
On 30/07/2017 09:43 AM Gorak Ganpat hire said:
All information it's very very very Like I.....and my all family

 
On 30/07/2017 09:43 AM Gorak Ganpat hire said:
All information it's very very very Like I.....and my all family

 
On 20/07/2017 08:50 PM Mahatma gandi said:
Mahatma gandi Nna patra

 
On 14/02/2017 02:59 PM nadim ustad said:
मस्त आहे

 
On 29/11/2016 02:14 PM Mukesh chindaliya said:
Jovan me agar aadarash karo to vah ho ! Savage Patti samvedana rakhane Vale, ' mahatma 'gadhi' Mukesh chindaliya

 
On 15/11/2016 07:18 PM vidya arjun said:
very very nice thinking. i like it

 
On 15/11/2016 07:15 PM vidya arjun said:
very very nice thinking. i like it

 
On 15/11/2016 07:14 PM vidya arjun said:
व्हेरी व्हेरी nice thinking. i like it.

 
On 07/10/2016 05:20 PM akash waghmare said:
its a very very nice.......

 
On 02/10/2016 11:09 PM Ashok Kolape said:
Very Good

 
On 01/10/2016 08:06 PM Pooja chavan said:
very nice

 
On 01/10/2016 08:06 PM Pooja chavan said:
very nice

 
On 01/10/2016 08:05 PM pooja chavan said:

 
On 01/10/2016 03:30 PM Vaibhav chaudhari said:
खूपच छान माहिती

 
On 30/09/2016 10:21 PM Nikita indalkar said:
Nice speech

 
On 28/09/2016 07:52 PM mhaske s r said:
व्हेरी गुड इन्फोमॅशन

 
On 09/09/2016 05:43 PM Ram gadade said:
Very nice

 
On 01/07/2016 02:39 PM raju begade said:
Its very nice

 
On 30/01/2016 03:49 PM Ananda Mahale said:
गांधीजींचे विचार must लिहिलेत

 
On 08/10/2015 03:17 PM so Nice said:

 
On 02/10/2015 06:44 PM Sahil Balu Khale said:
Brilliant

 
On 01/10/2015 07:03 PM said:
mahatma gandhi yanchavr prshansanch

 
On 30/09/2015 07:29 AM NICK naik said:
Nice lines

 
On 27/09/2015 08:15 AM Mangalsing Girase said:
very very good

 
On 06/09/2015 09:19 PM r j udapurkar said:
its a very nice

 
On 06/09/2015 09:19 PM r j udapurkar said:
its a very nice

 
On 05/09/2015 06:59 PM said:

 
On 31/05/2015 06:25 PM sulbha wagh said:
Nice